उद्रेक न्युज वृत्त
कोरपना ता. प्र/नितेश केराम
चंद्रपूर (कोरपना) :- ग्रामपंचायत कामगार सेनेच्या २० जुलै २०२३ च्या पावसाळी अधिवेशनाच्या महामोर्चाला राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आझाद मैदान येथे एकवठणार आहेत.
राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी,पेन्शन,ईपीएफ,उपदान १०% टक्केच भरती शासन स्तरावरून पारदर्शकपणे भरती करणे आधी मागण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदान येथील पावसाळी अधिवेशनावर मी एक ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून कितीही पाऊस आला तरी कोणते वादळ आले तरी मोर्चासाठी तयार आहे.कारण संघटना कोणतीही असो; राज्यातील राजकारणातील ३० ते ४० वर्ष पक्षांनी वैरत्व विसरून सत्तेसाठी एका ठिकाणी येऊन,सरकार स्थापन करतात.तरी आपण आपल्या पोटासाठी आपल्या भविष्यासाठी पुढच्या पिढीसाठी व आपल्या कुटुंबासाठी एका ठिकाणी का येऊ नयेत; म्हणून मी मोर्चाला जाणार आहे.कारण कुणाच्याही भूलथापांना बळी पडणार नाही.जे कोणी काही पदाधिकारी दुसऱ्या काही संघटनेचे नेते मोर्चा बद्दल बेबनाव अफवा पसरवत आहेत.कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम काही समाजकंटक करीत आहेत.अश्याने कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे.हे लक्षात ठेवावे.तरी राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ‘मी कर्मचारी माझा कर्मचारी मी कर्मचाऱ्यांचा’ या भावनेने मुंबई येथील आजार मैदानावर दिनांक २० जुलै २०२३ रोजी ठीक अकरा वाजता महाराष्ट्र सरकारला ६० हजार कर्मचाऱ्यांच्या संख्येने ताकद दाखवून प्रश्न सोडुन घेण्याचा व न्याय मिळण्याचा प्रयत्न करूयात.असे आवाहन विलास कुमारवार राज्य अध्यक्ष ग्रामपंचायत कामगार सेना,दयानंद एरंडे राज्य सरचिटणीस, जनार्दन मुळे राज्य कार्याध्यक्ष,अश्विनीताई मेश्राम राज्य उपाध्यक्षा,विजय उर्फ बाळू पाटील राज्य खजिनदार,नवनाथ नरवडे मराठवाडा विभागीय अध्यक्ष,हेमराज वाघाडे नागपूर विभागीय अध्यक्ष,रामेश्वर डिवरे अमरावती विभागीय अध्यक्ष यांनी केले आहे.