- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोरची(गडचिरोली):- रस्त्याचे काम सुरु असतांना सिमेंट काँक्रिट मिक्सरमध्ये अडकून एका तरुणाचा मृत्यू झाला असल्याची हृदयद्रावक घटना काल,गुरुवार २८ नोव्हेंबरला कोरची तालुक्यातील कोटगुल परिसरातील बडीमाध्ये गावात घडली.कैलास ब्रिजलाल पुडो वय २५ वर्षे,रा.बडीमाध्ये,ता.कोरची असे मयताचे नाव आहे.
कोरचीपासून २० किलोमीटरवरील बडीमाध्ये गावात काल गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ११ मीटर सिमेंट रस्ता बनविण्याचे काम सुरु होते.यावेळी सिमेंट मिसळत असतांना यंत्रात कैलास पुडो याचा हात गेला; यानंतर तो आत खेचला गेला व त्याचे संपूर्ण शरीर यंत्रात गुंडाळले गेले.त्यानंतर उपस्थितांनी
कैलासला १०८ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात नेले.डॉक्टरांनी तपासणी केली असता मृत घोषित केले.कोरची पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.
- Advertisement -