Monday, August 31, 2026
Homeछत्रपती संभाजी नगरमराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्याच्या मुलास; मिळाली सरकारी नोकरी……

मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्याच्या मुलास; मिळाली सरकारी नोकरी……

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

छत्रपती संभाजीनगर :- मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारे मराठा सेवक सुनील कावळे यांचा मुलगा नागेश कावळे यास येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापनेवर नोकरी देण्यात आली आहे.तसे नियुक्तीपत्र आमदार हरिभाऊ बागडे यांनी सुनील कावळे यांच्या पत्नी अंजनाताई कावळे व मुलगा सुनील कावळे यांच्याकडे सुपूर्द केले.

आमदार हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी कावळे कुटुंबिंयाची भेट घेत एक लाख रुपयाच्या आर्थिक मदत धनादेश सुपुर्द केला.सुनील कावळे यांच्या नावे असलेले पीक कर्ज व इतर कर्जाबाबतची माहिती घेत त्या विषयातही बँकेकडून मदत करून घेण्याचे व शासनाकडून मिळणारी मदत कावळे कुटुंबीयांना लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे बागडे यांनी सांगितले.तसेच, याप्रसंगी कावळे यांचा मुलगा नागेश सुनील कावळे याला उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापनेवर कनिष्ठ लिपिक या पदावरील नोकरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगत नियुक्तीपत्र सुनील कावळे यांच्या पत्नी अंजनाताई कावळे व मुलगा सुनील कावळे यांना देण्यात आले.

मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या सुनील कावळे यांनी मुंबईतील वांद्रे परिसरात आत्महत्या केली होती. १८ ऑक्टोबरच्या रात्री BKC येथील उड्डाणपुलावरील लोखंडी खांबला गळफास घेतला. सुनिल कावळे यांनी स्वतःचा शर्ट आणि वहीच्या पानावर आपण आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत असल्याचे लिहले होते. कावळे हे जालन्याहून एकटेच मुंबईत आले होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहिले होते. सुनील कावळे यांच्यानंतर मराठा समाजातील अनेक तरुणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आपले आयुष्य संपवले होते. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख राजकीय नेत्यांनी मराठा तरुणांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!