Tuesday, July 28, 2026
Homeगडचिरोलीअसत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणजे 'दसरा'….-आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची...

असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणजे ‘दसरा’….-आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची परंपरा आजही कायम….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा विजयादशमी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.हिंदू धर्मात दसऱ्याला विशेष महत्त्व आहे.यंदा २४ ऑक्टोबरला म्हणजेच आज दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.दसऱ्याच्या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध करून युद्ध जिंकले.हा सण असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणूनही साजरा केला जातो.या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला होता.या दिवशी रावण दहनासह देवी दुर्गेच्या मूर्तीचेही विसर्जन केले जाते.या परंपरेनुसार शहरात घरोघरी पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा करण्यात येणार. मंदिरांमध्ये व सार्वजनिक मंडळांमध्ये विजयादशमीचा सण साजरा करण्यात येणार आहे.

आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची परंपरा

दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना,आप्तेष्टांना, नातेवाईकांना आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे.या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या-नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की,दारात त्यांची पत्नी किवा बहीण त्यांना ओवाळीत असे.यानुसार दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने वाटण्याची परंपरा सुरू झाली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!