Wednesday, June 10, 2026
Homeमुंबईमयत व्यक्तीच्या अंगठ्याचा 'ठसा' घेण्यावर बसणार चाप...- मयत व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा उमटवून...

मयत व्यक्तीच्या अंगठ्याचा ‘ठसा’ घेण्यावर बसणार चाप…- मयत व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा उमटवून काढले जात होते बँक खात्यातून पैसे…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- मयत व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा उमटवून सरकारी योजनेचे पैसे बँक खात्यातून काढण्याचे प्रकार रोखण्यासाठी राज्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने आता संगणकाची सीडॅक सॉफ्टवेअर प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे रक्ताभिसरण सुरू असलेल्या म्हणजेच जिवंत अंगठ्याचा ठसा उमटला तरच लाभार्थ्याला बैंक खात्यातून पैसे मिळणार आहेत.

राज्यातील विविध शासकीय योजना,शेतकरी कर्जमाफी योजना,विद्यार्थ्यांना विविध विभागांमार्फत दिली जाणारी शिष्यवृत्ती इत्यादी ५० पेक्षा अधिक योजनांचे पैसे डीबीटी पोर्टलमार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.राज्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या खात्यात दरवर्षी ७ हजार कोटी तर शेतकरी आणि विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. याशिवाय निवृत्तीवेतन योजनेची रक्कमसुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते.त्यासाठी संबंधित लाभार्थ्यास दरवर्षी आपल्या हयातीचा दाखला द्यावा लागतो.तरच रक्कम त्याला

मिळते.परंतु इतर शासकीय योजनांचे तसे नाही. एकदा अंगठ्याचा ठसा घेतल्यानंतर त्याला पुन्हा ठसा द्यावा लागत नाही.नेमक्या याच त्रुटीचा फायदा घेऊन अनेकांनी मृत व्यक्तीच्या नावावरून बँकेतून रकमा काढल्या आहेत.याला आळा घालण्यासाठी सरकारने नवीन सॉफ्टवेअर आणण्याचा निर्णय घेतला आहे. लाभार्थ्यास थेट रक्कम मिळावी; या हेतूने सरकारने डीबीटी पोर्टल सेवा सुरु केली होती.पण सरकारचा हेतू साध्य होत नसल्याचे काही घटनांमधे मरण पावलेल्या व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा घेऊन पैसे काढल्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.मृत शेतकऱ्याच्या नावावर पैसे काढल्याचे अनेक प्रकार उघडकीस आल्यामुळे याला आळा घालण्यासाठी शासनाने आता सीडॅक सॉफ्टवेअर प्रणाली आणण्याचा निर्णय घेतला आहे.

(साभार-पुढारी)

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!