Thursday, September 3, 2026
Homeनागपूरमन सुन्न करणारी घटना..! साता जन्माचे साथी आयुष्याला कंटाळले; विषारी द्रव्य प्राशन...

मन सुन्न करणारी घटना..! साता जन्माचे साथी आयुष्याला कंटाळले; विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न.. – एकाचा मृत्यू तर एकजण रुग्णालयात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-सुरुवातीला सर्वकाही बरोबर होते.शरीर साथ देत होता.पण,आता म्हातारपण आले.अश्यातही आजारपणामुळे पत्नी सर्वात जास्त काळजीत असते. सर्व उपचार करूनही वेदना असह्य होत आहेत.अंत होण्यापेक्षा औषधीच जास्त खावी लागत आहे. त्यामुळे आता नैराश्य आले आहे.शरीरही थकले आहे.अशी चिठ्ठी लिहून साता जन्माचे साथी आयुष्याला कंटाळले आणि विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची घटना आज,बुधवार ६ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास नागपुरातील समर्थनगरी येथे उघडकीस आली. दोघांनीही विषारी द्रव्य प्राशन केल्याने यात ८० वर्षीय गंगाधर बालाजी हरणे रा.समर्थनगरी, शिवमंदीर मागे यांचा मृत्यू झाला तर पत्नी निर्मला हरणे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.गंगाधर हरणे यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.मुलगा सुधीर हा झारखंड मधील एका स्टील प्लॉन्टमध्ये लेखापाल तर मुलगी शुभांगी सुरपैठणकर ही नागपूरच्या कामठीतील एका खासगी शाळेत शिक्षिका आहे.त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पती-पत्नी हे परिसरात एकटेच वास्तव्यास होते.आज बुधवारी सकाळच्या सुमारास गंगाधर हरणे हे घराच्या समोरील वऱ्हांड्यात पडलेले दिसून आले.त्यांच्या तोंडातून फेस येत होता.सदरची बाब शेजारच्यांना दिसून येताच,त्यांनी याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देत,त्यांचा साळा राजू तिवस्कर आणि मुलगी शुभांगी हिला कळविले.दोघेही घरी पोहचले तेव्हा गंगाधर हरणे आणि त्यांची पत्नी बेशुद्धावस्थेत पडले होते.त्यांच्या शेजारीच, ‘टॅफगोर इन्सेक्टीसाईड’ याच्या दोन बॉटल्स पडलेल्या होत्या.यावेळी सोनेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन मगर हे ताफ्यासह घटनास्थळी पोहचले.मुलगी शुभांगी आणि साळा राजू तिवस्कर यांनी निर्मला यांना खासगी रुग्णालयात नेले.त्यांची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहेत.याप्रकरणी राजू विश्वनाथराव तिवस्कर वय-५६ वर्षे,रा.श्रीहरनगर, हुडकेश्वर यांनी दिलेल्या सूचनेवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे.विशेष म्हणजे,विष प्राशन करण्यापूर्वी गंगाधर हरणे यांनी एक चिठ्ठी लिहिली होती.सदरची चिठ्ठी ही डॉक्टरांना सापडली.त्यात त्यांनी अनेक गोष्टी नमूद केल्या.त्यात ‘अगोदर दोघांचीही प्रकृती ठिक होती. मात्र,कोरोनानंतर अल्सर झाला.त्याचे दुखने सुरू झाले.तेव्हापासून औषध खाऊन जगतो आहे.आता दाताचा त्रास सुरू झाला आहे.पत्नी माझ्या आजारपणामुळे जास्त काळजीत असते.सर्व उपचार केल्यावरही ते दुखणे सुरू आहे.त्याचा खूप त्रास होतो.तुम्हीही त्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहे.तुमच्यावर ओझे देण्याची मुळीच इच्छा नाही’.’एकटे जगून जिवाचे हाल होईल,या त्रासातून मुक्त व्हायचे आहे,’ असे हृदयद्रावक शब्द लिहून जीवनयात्रा संपवली. चिठ्ठीतील लिहिलेले शब्द वाचून अनेकांचे डोळे पाणावले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!