Saturday, September 12, 2026
Homeछत्रपती संभाजी नगरमनोज जरांगे पाटील येत्या ४ जुन पासून बसणार उपोषणाला…-जरांगे नी केली घोषणा…

मनोज जरांगे पाटील येत्या ४ जुन पासून बसणार उपोषणाला…-जरांगे नी केली घोषणा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

छत्रपती संभाजीनगर :- गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली आहे.आम्ही येत्या चार जून रोजी उपोषणाला बसणार आहोत; असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे.येत्या चार जून रोजी जरांगे नारायण गडावर सभा घेणार आहेत.त्यानंतर चार जून रोजी ते उपोषणाला बसणार आहेत.चार जून हा मुहूर्त वगैरे काही नाही.स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात आम्हाला आनंद आहे; असे जरांगे यांनी सांगितले आहे.

मराठा कोणत्याही पक्षाचा असू द्या.४ जून रोजी सकाळी नऊ वाजता उपोषण सुरू होणार आहे.या लढ्यात सामील होण्यासाठी माझ्या समाजाला आव्हान करायची गरज नाही.लोकसभा निवडणुकीमध्ये मी नाही.आम्ही कुणाचा प्रचार केला नाही.कुणाला निवडून आणण्याचेही आम्ही आवाहन केलेले नाही.आमचा महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा नव्हता.मी फक्त उमेदवारांना पाडण्याचे आवाहन केले.कोणाला पाडायचे हे मराठा समाजाल कळलेले आहे; असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात कधीच आले नव्हते.मात्र आता मोदी गोधड्यांसहित येथे आले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या दहा वर्षांत माध्यमांना कधीच बोलले नाहीत. आता मात्र ते माध्यमांसमोर बोलत आहेत.पूर्वी ते कुणाचाच प्रचार करत नव्हते.मात्र ते आता सगळ्यांचा प्रचार करायला लागले आहेत.ही वेळ भाजपच्या काही मोजक्या नेत्यांवर आली आहे.या सगळ्या परिस्थितीला भाजपचे पाच स्थानिक नेते जबाबदार आहेत.या लोकांना बारा बलुतेदार,दलित,मुस्लीम, धनगरांबद्दल द्वेष आहे; असा आरोप जरांगे यांनी केला आहे.

मी कुणालाच पाठिंबा दिलेला नाही.मी कुणालाच पाठींबा देत नाही.नोकरदारांची पदोन्नती होत नाही. दहा टक्के आरक्षण लोकांच्या कामाचे नाही.आता सामान्य मराठ्यांना वाटायला लागलंय की भरत्या थांबल्या आहेत.विधानसभेत गणित बिघडवणार नाही.मैदानातच मी राहणार आहे. सगे-सोयऱ्याची अंमलबजावणी करायला हवी. मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा पारित केला नाही तर मी मैदानात उतरणार आहे.फडणवीस,शिंदे यांना आवाहन आहे की,आमच्या हक्काचं आम्हाला द्या. दिलं नाही तर २८८ जागांवर आम्ही सर्व जाती-धर्माचे लोक निवडणूक लढवणार आहोत; असा इशाराही जरांगे यांनी दिला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!