Wednesday, October 28, 2026
Homeनागपूरमतदारांना भुलविण्यासाठी रेशन किटचा वापर - निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई; २२०...

मतदारांना भुलविण्यासाठी रेशन किटचा वापर – निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई; २२० किट बॅग्ज जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेत मतदारांना भुलविण्यासाठी कुठल्याही वस्तू,पैशांचे वाटप करता येत नाही; असा नियम आहे. मात्र,उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी रेशन किट तयार करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने कारवाई करीत मोतीबाग सेंट्रल रेल्वे कॉलनीतील एका क्वॉर्टरच्या मोकळ्या भागातून २२० किट बॅग्ज जप्त केल्या आहेत.या बॅग्जमध्ये नागपूर पश्चिमचे अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांचे प्रचारपत्रक आढळले आहे. नागपूर-पश्चिमच्या उमेदवाराच्या नावाचा साठा नागपूर-उत्तर मतदारसंघात आढळल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
मोतीबाग येथील सेंट्रल रेल्वे कॉलनीतील एका क्वॉर्टरमध्ये मोठ्या प्रमाणात रेशन किट असल्याची माहिती निवडणूक आयोगाला एका व्यक्तीने दिली. भरारी पथकाने तेथे जाऊन पाहणी केली असता क्वॉर्टरच्या मोकळ्या भागात २२० किट बॅग्ज असल्याची बाब स्पष्ट झाली.तातडीने जरीपटका पोलिस ठाण्याच्या पथकालादेखील बोलविण्यात आले.या बॅग्जची पाहणी केली असता,त्यात नरेंद्र जिचकार यांचे प्रचारपत्रकदेखील आढळून आले.हा सर्व माल जरीपटका पोलिस ठाण्यात पोहोचविण्यात आला असून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून रात्री उशिरा तक्रार करण्याची प्रक्रिया सुरू होती.या मालाचा पंचनामा झाल्यावर तक्रार होईल व नंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होईल,अशी माहिती जरीपटका पोलिस ठाण्याचे ठाणेदार अरुण क्षीरसागर यांनी दिली.
दरम्यान,न्यू अहबाब कॉलनी,महेश नगर येथेदेखील हजारपेक्षा जास्त रेशन किट्स सापडल्या आहेत. निवडणूक आयोग व पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.या किट्सची रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती.
संबंधित क्वॉर्टर रेल्वेचे होते व ते एका कर्मचाऱ्याला अलॉटदेखील आलेले आहे.त्या क्वॉर्टरसमोर मोकळी जागा असून तेथेच काल,रविवारी एका गाडीतून रेशन किट्स उतरविण्यात आल्या.त्यानंतर याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली.सरकारी परिसराचा अशा पद्धतीने वापर करणे हादेखील आचारसंहितेचा भंग असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.दरम्यान,नरेंद्र जिचकार हे नागपूर-पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार असताना त्यांच्या नावाच्या किट बॅग्ज नागपूर-उत्तरमधील भागात कशा काय ठेवण्यात आल्या याची चौकशी सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्हा परिषद अनुकंपा नियुक्तीसाठी समुपदेशन; प्रतीक्षासूचीतील १९२ उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त पदांवर अनुकंपा नियुक्तीसाठी येत्या,सोमवार २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता समुपदेशन...

पंतप्रधानांच्या हस्ते ‘पीएम किसान’च्या २४ व्या हप्त्याचे वितरण; पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये होणार जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात ‘पीएम किसान’ योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण येत्या,शुक्रवार ३० ऑक्टोंबर २०२६ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधानांच्या हस्ते ‘पीएम किसान’च्या २४ व्या हप्त्याचे वितरण; पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये होणार जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात ‘पीएम किसान’ योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण येत्या,शुक्रवार ३० ऑक्टोंबर २०२६ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून माजी प्राध्यापकाची केली हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोथली गावनजीक एका माजी प्राध्यापकाची अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून हत्या केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!