Monday, July 13, 2026
Homeनागपूरपूर्वसूचना नोटीस न देता वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरण कंपनीला ग्राहक तक्रार निवारण...

पूर्वसूचना नोटीस न देता वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरण कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका… – ग्राहकाला भरपाई मंजूर; अन्यथा भरपाईच्या रकमेवर ९ टक्के व्याज होणार लागू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-ग्राहकाला नोटीस न देता वीजपुरवठा खंडित केल्यामुळे महावितरण कंपनीला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका बसला.आयोगाने तक्रारकर्त्या ग्राहकाला शारीरिक मानसिक त्रासाकरिता पाच हजार व तक्रार खर्चापोटी तीन हजार अशी एकूण आठ हजार रुपये भरपाई मंजूर केली.
भरपाई अदा करण्यासाठी महावितरणला २२ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.या आदेशाचे उल्लंघन झाल्यास भरपाईच्या रकमेवर ९ टक्के व्याज लागू होईल,असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. श्रीकांत सिरपूरकर,असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव असून,ते टेलिकॉम कॉलनी येथील रहिवासी आहेत.
त्यांना आयोगाचे अध्यक्ष सतीश सप्रे,सदस्य मिलिंद केदार व शीतल पेटकर यांनी हा दिलासा दिला. सिरपूरकर यांना मार्च-२०१६ मधील ९४० रुपयांचे वीजबिल एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात देण्यात आले होते.ते बिल ९ एप्रिलपर्यंत भरायचे होते.परंतु, कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांनी १२ एप्रिल रोजी बिल जमा केले. त्यानंतर कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता १३ एप्रिल रोजी त्यांचा वीजपुरवठा खंडित केला गेला.त्या वेळी त्यांची वयोवृद्ध आई एकटीच घरी होती.आईने वीजबिल भरल्याची माहिती देऊनही महावितरण कर्मचारी माघारी फिरले नाही.शेवटी सिरपूरकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. असे असले तरी,महावितरणच्या अवैध कारवाईमुळे शारीरिक-मानसिक त्रास झाल्याने सिरपूरकर यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती.
महावितरणने सेवेत त्रुटी ठेवली वीजपुरवठा खंडित करायचा असल्यास महावितरणने ग्राहकाला वीज कायद्यातील कलम ५६ अंतर्गत पूर्वसूचना नोटीस देणे अनिवार्य आहे.परंतु,या प्रकरणात महावितरणने अवैध कारवाई केली.वीजबिल भरल्याबाबतचा कोणताही पुरावा न मागता वीजपुरवठा खंडित केला.त्यावरून महावितरणने सेवेत त्रुटी ठेवल्याचे सिद्ध होते.त्यांच्या अवैध कृतीमुळे ग्राहकाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मनस्ताप सहन करावा लागला,असे परखड निरीक्षणही न्यायालयाने निर्णयात नोंदविले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!