- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंजवरू न कामे आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या एका तरुण घर बांधकाम कंत्राटदाराचा(ठेकेदार)भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील लहरी कारखान्याजवळ घडली.गुरुदेव दिनाजी वसाके वय ३८ वर्षे,रा.कोंढाळा, ता.देसाईगंज,जि.गडचिरोली असे अपघातात मृत पावलेल्या तरुण कंत्राटदाराचे नाव आहे.
कोंढाळा येथील गुरुदेव वसाके हे देसाईगंज शहर व परिसरात घर बांधकामाची कंत्राटे घ्यायचे.हल्ली देसाईगंज शहराच्या गांधी वार्डात काम सुरू असल्याने आज रविवारी ते बांधकामस्थळी गेले होते.रविवारला देसाईगंज येथील बाजार असल्याने हप्ता भराची कामावरील मजुरांची मजुरी अदा करून दुपारच्या सुमारास एकटेच दुचाकीने देसाईगंजवरून गावाकडे निघाले होते.तब्बल सात किलोमीटर अंतर पार केल्यानंतर गावापासून अवघ्या एक किलोमिटर अंतरावर असलेल्या लहरी कारखान्याजवळ देसाईगंज -आरमोरी मुख्य मार्गावर देसाईगंजकडे जाणारी रुग्णवाहिका (अँब्युलन्स)आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक बसली.धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा समोरील भाग चक्काचूर झाला.अश्यातच दुचाकीवरील गुरुदेव वसाके हे दूरवर फेकले जाऊन मुख्य मार्गावर कोसळल्याने नाक व तोंडावाटे रक्तस्त्राव होऊन शरीरावर गंभीर जखमा झाल्या. अपघात घडताच मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. दरम्यान,ओळख पटल्याने कुटुंबीयांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गुरुदेव यांना देसाईगंज येथील रुग्णालयात नेत असतांनाच वाटेतच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात पाठवला.रुग्णवाहिका पोलीस ठाण्यात जमा करून घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.
गुरुदेव वसाके यांच्या पश्चात चार वर्षाचा चिमुकला, पत्नी,आई,वडील व दोन मोठे भाऊ असा आप्त परिवार आहे.अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेने वसाके कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
- Advertisement -

