Tuesday, September 29, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तभीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू..

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-भरधाव वेगात असलेली अनियंत्रित वॅगनर कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरच्या मागील बाजूस जोरदार धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार २८ जून रोजी दुपारच्या सुमारास अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक-१०६ परिसरात घडली.महादेव जिवाजी जीवने वय ६५ वर्षे,लताबाई महादेव जीवने वय ६० वर्षे, भास्कर महादेव जीवने वय ४३ वर्षे,आरती भास्कर जीवने वय ४० वर्षे व जिज्ञा(त्रिशा)भास्कर जीवने वय १२ वर्षे अशी मृतकांची नावे असून सर्वजण चंद्रपूर शहरातील शासकीय डी.एड.महाविद्यालय जवळील बाबुपेठ परिसरातील रहिवासी होते.
जीवने कुटुंबीय आज,रविवारी एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी वॅगनार कारने समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होते.दरम्यान,अमरावती जिल्ह्याच्या
धामणगाव रेल्वेजवळील चॅनेल क्रमांक-१०६ परिसरात रस्त्याच्या कडेला एक कंटेनर उभा होता.याचवेळी कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील कार थेट उभ्या कंटेनरच्या मागील बाजूस धडकली.धडक इतकी जोरदार होती की,कारचा समोरील भाग पूर्णपणे कंटेनरमध्ये शिरला आणि अक्षरशः चक्काचूर झाला.यामुळे कारमधील पाचही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस,स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आले. अपघाताची तीव्रता जास्त असल्याने कुणालाही वाचवता आले नाही.मृतदेह शवविच्छेदनासाठी धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आष्टी व अहेरीतील रुग्णालयांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडून पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि गावंडे यांनी नुकतेच ग्रामीण रुग्णालय आष्टी,उपजिल्हा रुग्णालय अहेरी आणि महिला व बाल रुग्णालय अहेरी येथे भेट देऊन...

चिवडा खाल्ल्यानंतर सात जणांना विषबाधा..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या वरोरा शहरातून आज,सोमवार २८ सप्टेंबरच्या दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली. एका चिवडा सेंटरमधील चिवडा खाल्ल्यानंतर तब्बल सात जणांना विषबाधा...

माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी- अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी,असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले. आंतरराष्ट्रीय माहिती...

गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू; मिरवणूक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पूर्वपरवानगी आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महापुरुषांचे पुतळे विनापरवानगी बसविणे किंवा त्यांचे अनावरण करणे तसेच इतर बाबींवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!