Saturday, September 5, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तभालाफेकपटू नीरज चोप्राची अभिमानास्पद कामगिरी; ९० मीटर लांबीचा पल्ला पार..

भालाफेकपटू नीरज चोप्राची अभिमानास्पद कामगिरी; ९० मीटर लांबीचा पल्ला पार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व करीत दोन वेळेचा ऑलिम्पिक पदक विजेता भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे.नुकतेच बुधवार १४ मे रोजी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नीरज चोप्रा यांची भारतीय सैन्य दलाच्या लेफ्टनंट कर्नल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.अश्यातच आता नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये ९०.२३ मीटर भाला फेकत स्वतःचाच रेकॉर्ड तोडला आहे.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजला ९० मीटर लांबचे अंतर गाठता आले नव्हते आणि त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.परंतु, यानंतर दोहा डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने ९०.२३ मीटर भाला फेकत अभिमानास्पद कामगिरी करून दाखवली आहे.नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये ९० मीटर पेक्षा लांब भाला फेकत त्याचा सर्वोत्कृष्ट आकडा गाठला.नीरजने तिसऱ्या प्रयत्नात ९०.२३ मीटर भाला फेकला.दोहा डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने पहिल्या प्रयत्नात ८८.४४ मीटर टप्पा गाठला.तर दुसरा थ्रो फाऊल ठरला.तिसऱ्या प्रयत्नात त्याने ९० मीटरचा टप्पा ओलांडून ही सर्वोत्तम कामगिरी केली.यापूर्वी नीरज चोप्राचा बेस्ट थ्रो ८९.९४ मीटर होता.नीरज चोप्रा ऑलिम्पिक,जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि आशियाई खेळांमध्ये दुहेरी पदक विजेता आहे.त्याने यापूर्वीही एकदा डायमंड लीग जिंकली आहे.चोप्राने २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि असे करणारा तो पहिला आशियाई भालाफेकपटू बनला होता.२०२३ मध्ये विजय मिळवल्यानंतर तो जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणारा पहिला आशियाई खेळाडू ठरला होता. दरम्यान,२०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज ८९.४५ मीटरपर्यंत भाला फेकू शकला होता,परंतु पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर भाला फेक करून सुवर्णपदक जिंकले.मात्र,आता नीरज चोप्राने ९०.२३ मीटर भाला फेकून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!