Monday, August 17, 2026
Homeब्रम्हपुरीब्रम्हपुरीच्या रामपुरीत वाघाचा हल्ला; जखमीच्या पोटाच्या निघाल्या आतड्या..!

ब्रम्हपुरीच्या रामपुरीत वाघाचा हल्ला; जखमीच्या पोटाच्या निघाल्या आतड्या..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी तालुक्याच्या मेंडकीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या नवेगाव खुर्द येथील रहिवासी जयपाल लक्ष्मण उईके वय ४६ वर्षे,
 हे नेहमीप्रमाणे काल गुरुवारी दुपारी रामपुरी जंगल परिसरात गायी चारण्यासाठी गेले होते.अश्यातच नियत वनक्षेत्रा लगतच्या रामपुरी जंगल शिवारातील कक्ष क्रमांक-१५४ येथे गायी राखत असतांना घनदाट झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे  हल्ला केला.यात जयपाल गंभीर जखमी होऊन पोटाच्या आतड्या बाहेर निघून झटापटीत पाठीला, हाताला आणि मानेला जबर मार बसला आहे.
या आधी दोन वर्षा पूर्वी त्यांना याच रामपुरी जंगल शिवारात वाघाने हल्ला करून जखमी केले होते. नशीब बलवत्तर म्हणून मागील हल्ल्यातूनही ते बचावले.परत पुन्हा एकदा वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले.जखमीला उपचारासाठी ब्रम्हपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमीला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!