- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-हजारो वर्षांच्या सामाजिक,धार्मिक आणि सांस्कृतिक गुलामगिरीतून मुक्त करून संविधानाची ताकद आणि बुद्धाच्या मार्गाने कोट्यवधी दीन,दलित, शोषित समाजाला स्वाभिमानी सन्मानाचे आयुष्य देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काल शुक्रवारी बौद्ध-आंबेडकरी अनुयायांसह एकूणच भारतीय नागरिकांनी त्यांना अभिवादन केले.नागपुरातही विविध सामाजिक,सांस्कृतिक व धार्मिक संघटनांनी त्यांना विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन केले.दीक्षाभूमी,संविधान चौक,शांतिवन चिचोली आदींसह शहरातील विविध भागांमध्ये बुद्ध विहारांमध्ये महामानवास अभिवादन करण्यात आले.
दीक्षाभूमी आणि संविधान चौकात दिवसभर भीम सैनिकांची गर्दी पाहायला मिळाली.दीक्षाभूमीवरील बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन करण्यात आले.बुद्ध-आंबेडकरी साहित्य
विक्रीच्या स्टॉलवर उपासकांची गर्दी होती.संघटनांतर्फे अनुयायांसाठी अल्पोपाहार,चहाचे वाटप करण्यात आले.ठिकठिकाणी भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.दीक्षाभूमी व संविधान चौकात समता सैनिक दलाच्या वतीने रक्तदान शिबिरही घेण्यात आले.मोठ्या संख्येने तरुणांनी रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती,दीक्षाभूमी आणि अखिल भारतीय धम्मसेना यांच्या संयुक्त विद्यमाने स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत दीक्षाभूमी येथे बुद्धवंदना घेण्यात आली.यावेळी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.याप्रसंगी स्मारक समितीचे डॉ.सुधीर फुलझेले,ॲड.आनंद फुलझेले,एन.आर.सुटे, प्राचार्य,प्राध्यापक,विद्यार्थी उपस्थित होते.
- Advertisement -

