उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने बॉलिवूडमध्ये मोठा ठसा उमटवणारे सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे.वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला.त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी,सतीश कौशिक होळी खेळत होते. ज्यामध्ये ते खूप आनंदी दिसत होते आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचे निधन झाले.सदर घटनेमुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.सतीश कौशिक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रिपोर्ट्सनुसार,सतीश कौशिक हरियाणातील गुरुग्राममध्ये आले होते.त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.ज्यावेळी त्यांची प्रकृती खालावली,त्यावेळी ते कारमध्येच होते, असे सांगण्यात येत आहे.घाईघाईत त्यांना गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले.मात्र त्यांना वाचवता आले नाही.