उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- तथागत भगवान गौतम बुद्ध दिनाचे औचित्य साधून आज ५ मे २०२३ ला प्राचार्य हेमंत रामटेके परीवारातर्फे गडचिरोली येथील वृद्धाश्रमातील वयोवृध्दांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करून रामटेके परीवारांनी पुन्हा एकदा समाजाप्रती एक आदर्श निर्माण केला आहे.

दरवर्षी प्राचार्य हेमंत रामटेके गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रति असलेली कळवळा लक्षात घेऊन भोजनदान करायचे; मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता त्यांनी वृद्धांना सहकार्य करण्याचे ठरविले. त्यानुसार वृद्धाश्रमातील वृध्दांना जिवनावश्यक साहित्यांचे वाटप केले.साहित्यांचे वाटप करतेवेळी डॉ.विजय रामटेके गडचिरोली,रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा.मुनिश्वर बोरकर,व्यवस्थापक गंगाधर चंदावार,डॉ. श्रृति विजय रामटेके,माला हेमंत रामटेके,ज्योती विजय रामटेके,रुची हेमंत रामटेके,सचिन बोरकुटे तर प्रसंगी संचालक सुनिलभाऊ पोरड्डीवार यांनी सर्वांना शुभेच्छा बुद्ध जयंती दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. जीवनावश्यक साहित्य स्विकारतेवेळी वृद्धाश्रमातील प्रा.किरकीरे,मारोती कडुमवार,रामचंद्र गणविर,हरिचंद्र तोरे,ॲन्थोनी,कांताबाई कोठारवार, मंजुळा टिकले,विमल रोहणकार इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.