Sunday, September 6, 2026
Homeनागपूरबीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकाला रंगेहात पकडले.सदरची कारवाई ही २४ ऑगस्ट २०२६ रोजी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर रोडवरील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात करण्यात आली. आकाश दत्ता जाधव वय ३६ वर्षे,असे अटकेतील अधिकाऱ्याचे नाव आहे.या कारवाईमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडाली आहे.यातील विशेष बाब म्हणजे,लाचेच्या मागणीला कंटाळलेल्या व्यावसायिक तक्रारदाराने अमरावतीऐवजी नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

आकाश जाधव हे अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर येथील विभागीय कार्यालयात दुय्यम निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.प्रकरणातील तक्रारदार व्यावसायिकाला चिखलदरा मार्गावरील नरसाळा गावात रेस्टॉरंट अँड बारसाठी ‘एफएल-३’ परवाना आवश्यक होता. परवान्यासाठी ऑनलाईन अर्जही केला होता.यासंबंधीची कागदपत्रे १० ऑगस्ट २०२६ रोजी अचलपूर येथील उत्पादन शुल्क कार्यालयात सादर केल्यानंतर,दुय्यम निरीक्षक आकाश जाधव यांनी तक्रारदाराकडे एकूण आठ लाख रुपयांची लाच मागितली होती.यामध्ये स्वतःसाठी तीन लाख आणि वरिष्ठांसाठी पाच लाख रुपये अशी मागणी होती. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही परवाना देण्यासाठी त्याला कथितरीत्या त्रास दिला जात होता.लाचेच्या मागणीला कंटाळलेल्या व्यावसायिक तक्रारदाराने १२ ऑगस्ट २०२६ रोजी अमरावतीऐवजी नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.तक्रारीच्या आधारे २४ ऑगस्ट २०२६ रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली.तडजोडीअंती,आरोपी आकाश जाधव याने स्वतःसाठी अडीच लाख रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शवली.त्यानुसार,अचलपूर येथील उत्पादन शुल्क कार्यालयातील त्याच्याच कक्षात सापळा रचण्यात आला आणि लाच स्वीकारताच नागपूरच्या एसीबी पथकाने त्याला ताब्यात घेतले.या प्रकरणी परतवाडा पोलीस स्टेशन,अमरावती येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान,अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण, पोलीस निरीक्षक राजकिरण येवले यांचेसह त्यांच्या पथकाने केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!