- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला होता.तर शनिवार,२८ मार्च २०२६ रोजी उमरझरी परिसरात ४८ वर्षीय माया रामकृष्ण सोनवाने यांच्यावर वाघिणीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते.त्यांच्यावर भंडारा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते.प्रकृती अधिक खालावल्याने वनविभागाने त्यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.या दरम्यान बुधवार,१ एप्रिल २०२६ रोजी नागपुरात माया सोनवाने यांचे निधन झाले.एकट्या साकोली तालुक्यातील परिसरात जेमतेम बोटावर मोजण्याइतकेच दिवस झालेले असतांनाच वाघिणीच्या हल्ल्यात दोघांनी जीव गमावला.अश्यातच आता सदरच्या दोन्ही घटना ताज्या असतांनाच परत आज,बुधवार १५ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याने एका पाच वर्षीय चिमुकलीचा जीव घेतल्याची घटना साकोली तालुक्यातील विर्शी गाव नजीकच्या शेतशिवारात घडली.अंशिका काशिनाथ मिरी वय ५ वर्षे, रा.सुहेला,जि.बलोदा(बाजार),छत्तीसगड(हल्ली मुक्काम-विर्शी)असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
साकोली तालुक्याच्या विर्शी येथील संजय कापगते यांचे गाव नजीकच्या शेतशिवारात वीटभट्टीचे काम सुरू आहे. याकरीता मजूर म्हणून काशिनाथ मिरी हे कुटुंबीयांसह कापगते यांच्या वीटभट्टीच्या कामावर असल्याने ते शेतातच तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्यास आहेत.सकाळी उठणे आणि दिवसभर विटा तयार करून पोटाची खळगी भरणे,अशी दिनचर्या मिरी कुटुंबीयांची सुरळीतपणे सुरू असतांनाच आज बुधवारच्या पहाटे दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानकपणे अंशिका हिच्यावर हल्ला चढवून तिला जबड्यात पकडुन नेले आणि ठार केले.पहाटेची घटना असल्याने मिरी कुटूंबीय झोपेतच होते.काही वेळाने सदरचा प्रकार लक्षात येताच माता पित्याने एकच हंबरडा फोडला.
- Advertisement -

