Monday, August 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तबारा नक्षल्यांचा खात्मा तर तीन जवान शहीद..

बारा नक्षल्यांचा खात्मा तर तीन जवान शहीद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छतीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील गंगलूर पोलिस स्टेशन हद्दीतील घनदाट जंगल परिसरात आज,बुधवार ३ डिसेंबरला सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत बारा नक्षलवाद्यांचा खात्मा तर तीन जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांचे बाराही मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले असून परिसरात शोधमोहीम सुरू आहे.चकमकीच्या ठिकाणाहून एसएलआर रायफल,३०३ रायफल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.त्याचबरोबर,मृत नक्षलिंचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आज बुधवारी जिल्हा राखीव पोलीस दल,केंद्रीय राखीव पोलीस दलासह इतर सुरक्षा दलांचे संयुक्त पथक गंगलूरच्या जंगल परिसरात शोधमोहीम राबवत होते.यादरम्यान,नक्षलींनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला.याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले.आज सकाळपासूनच चकमक सुरू होती.गंगलूर हा नक्षलवादाच्या दृष्टीने संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो.परिसरात नक्षली कमांडर पापा रावचे वर्चस्व असल्याचे बोलल्या जाते.चकमकीत सुरक्षा दलाचे तीन जवान शहीद झाले आहेत.तिन्ही जवान जिल्हा राखीव पोलीस दलात कार्यरत होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!