Sunday, June 21, 2026
Homeगडचिरोलीबापरे..! एका हाताने धुंडा असलेल्या व्यक्तीने २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच केला खून..

बापरे..! एका हाताने धुंडा असलेल्या व्यक्तीने २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच केला खून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-काही वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने खांद्यापासून डावा हात गमावलेल्या एका ५५ वर्षीय धुंडा व्यक्तीने पैश्याच्या वादातून २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील करंचा गावात उघडकीस आली.लक्ष्मण सोमा आलाम वय ५५ वर्षे,रा.करंचा,ता.अहेरी,जि.गडचिरोली असे आरोपीचे नाव असून त्याचा उजवा हात शाबूत असल्याने त्याने चक्क उजव्या हातात कुऱ्हाड घेऊन  क्रूरपणे खून केल्याचे समोर आले आहे.प्रकरणी मरपल्ली पोलिसांनी आरोपीस अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.महेश सत्यन्ना ओडिला वय २८ वर्षे,रा.कर्जी, ता.दायगाम,जि.कोमाराम भीम,तेलंगणा असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून महेश ओडिला व त्याचा मित्र राजेश चापिला हे दोघे गुरुवार १८ जून २०२६ रोजी तेलंगणातून गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील करंचा गावी आले होते.दरम्यान,येनकाबंडा गावात एका तेरवीचा कार्यक्रम झाल्यानंतर महेश ओडिला व त्याचा मित्र राजेश चापिला हे करंचा येथील लक्ष्मण आलाम याच्या घरी रात्री मुक्कामासाठी थांबले होते.रात्रीचे
जेवण करून तिघेही अंगणात स्वतंत्र खाटेवर झोपले होते.पण,आरोपी लक्ष्मण आलाम याच्या मनात पैश्याच्या रागाची काहीतरी वेगळीच खिचडी पकत असल्याने त्याने शुक्रवार १९ जूनच्या मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या महेश ओडिला याच्या डोक्यावर व गळ्यावर कुऱ्हाडीने जोरदार वार केले.यातच महेशचा मृत्यू झाला.घटनेनंतर महेशसोबत असलेल्या राजेश चापिला याने तात्काळ मरपल्ली पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व जंगल परिसरात छपून बसलेल्या आरोपी लक्ष्मण आलाम यास अटक केली.प्रकरणाचा पुढील तपास मरपल्ली पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात; सत्ताधारी आणि विरोधक येणार आमनेसामने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे उद्या,सोमवार २२ जून २०२६ पासून सुरू होणार आहे. सदरचे अधिवेशन तब्बल तीन आठवडे चालणार असून राज्य...

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यातील तब्बल...

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!