Wednesday, September 23, 2026
Homeगडचिरोलीबांबूचे वास्ते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा नाल्यात बुडून मृत्यू…

बांबूचे वास्ते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा नाल्यात बुडून मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-एटापल्ली तालुक्याच्या एटापल्ली-गेदा मुख्य मार्गावरील गेदा गावानजीकच्या नाल्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.रमेश श्रीरंग मोगरकर वय ४५ वर्षे,रा.गेदा असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावरील गेदा गावातील रमेश मोगरकर हे नेहमीप्रमाणे बुधवारी पहाटेला बांबूचे वास्ते आणण्यासाठी घरून बाहेर निघाले होते.बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने गावातील नागरिकांनी शोधाश केली.मात्र,त्यांचा कुठेही पत्ता लागलेला नसल्याने गावातील नागरिक जंगलामध्ये गेले असता,थोड्या अंतरावर नाल्यातील झाडाला लटकलेल्या अवस्थेत ते नागरिकांना सकाळी दिसले.नागरिकांनी त्याला बाहेर काढून एटापल्लीच्या रुग्णालयात दाखल केले; मात्र,डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.घटनास्थळी तहसीलदार हेमंत गागुंर्डे व तलाठी उसेंडी यांनी भेट दिली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!