- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-ऐन रक्षाबंधन सणाच्याच दिवशी काळाने झडप घालून एका ८ वर्षीय चिमुकल्याचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला,तर वडिलांचा डावा हात व पाय मोडून गंभीर जखमी झाले व आई किरकोळ जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सिरोंचा तालुक्याच्या अंकिसा गावाजवळ घडली.शौर्य संतोष कोक्कू वय,८ वर्षे,रा.असरअल्ली,ता.सिरोंचा, जि.गडचिरोली असे अपघातात जागीच मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे,तर संतोष रामलू कोक्कू वय, ४३ वर्षे रा.असरअल्ली हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ सिरोंचा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.मात्र,प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता तातडीने तेलंगणातील वारंगल येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
रक्षाबंधन सण असल्याने संतोष कोक्कू त्यांची पत्नी सौंदर्या कोक्कू व मुलगा शौर्य हे तिघेही आज शनिवारी सकाळच्या सुमारास दुचाकीने असरअल्लीवरून बहिणीकडे सिरोंचा येथे जाण्यासाठी निघाले होते.अंकिसा गावाजवळ जाताच रस्त्याच्या कडेला रामकृष्ण चिरला यांच्या मालकीची ट्रॅक्टर ट्रॉली उभी होती.सदरच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला संतोष कोक्कू यांच्या दुचाकीची धडक बसली.धडक इतकी भीषण होती की,चिमुकल्या शौर्यचा जागीच मृत्यू झाला.तर संतोष कोक्कू यांचा डावा हात व पाय मोडला.तर पत्नी सौंदर्या कोक्कू यांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर सिरोंचा रुग्णालयात उपचार सुरु आहे.घटनेची माहिती सिरोंचा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरु केला आहे.
- Advertisement -

