Saturday, September 12, 2026
Homeदेसाईगंजबंद गाळे सुशिक्षित बेरोजगारांना भाडेतत्त्वावर तात्काळ देण्यात यावे......- देसाईगंज समाजवादी पक्षाचे तालुका...

बंद गाळे सुशिक्षित बेरोजगारांना भाडेतत्त्वावर तात्काळ देण्यात यावे……- देसाईगंज समाजवादी पक्षाचे तालुका महासचिव प्रीतम जनबंधु यांची मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

देसाईगंज :-शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील बंद असलेले गाळे सुशिक्षित बेरोजगारांना भाडेतत्त्वावर तात्काळ देण्यासंदर्भात देसाईगंज समाजवादी पक्षाचे तालुका महासचिव प्रीतम जनबंधु यांनी आज २० जानेवारी २०२३ रोजी नगरपरिषचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

जनबंधु यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,देसाईगंज शहराच्या सर्व्हे नं.२२/८० येथील व्यावसायिक गाळ्यांसाठी ०.३६ हे. आर.जागेत नगर विकास ६ (३) योजने अंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांच्या व्यावसायिक प्रयोजनार्थ गाळ्यांचे बांधकाम करुन सुशिक्षित बेरोजगारांना अटी व शर्थीच्या अधिन राहून भाडेतत्वावर गाळे देण्यासाठी तब्बल १७० च्या वर गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले.मात्र नगर परिषदेशी करण्यात आलेल्या करारनाम्यातील अटी व शर्थींना हरताळ फासुन दुकान दुसरीकडे तर गोडाऊन नगर परिषदेच्या शापिंग काम्पलेक्स मध्ये करण्यात आले आहेत.

नियमानुसार एका व्यक्तीला एकच गाळे भाडेतत्वावर देणे बंधनकारक असताना एका व्यक्तीला एका पेक्षा जास्त गाळे देण्यात आले असुन देण्यात आलेल्या सदर दुकानदारांनी गाळ्यांची तोडफोड करून अटी व शर्थीचे उल्लंघन केले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे जवळपास ५० सुशिक्षित बेरोजगारांच्या रोजगारावर पाणी फेरल्या गेले असल्याने गाळा दुस-याच्या नावे तर वहिवाट भलत्याचीच असल्याचे एकंदरीत स्थितीवरुन दिसुन येत असल्याने सदर प्रकरणाची योग्य चौकशी करावी व सध्या स्थितीत बंद असलेले सुशिक्षित बेरोजगार युवकांना वाटप करण्यात यावे अन्यथा समाजवादी पार्टी देसाईगंज तालुका तर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!