- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-बेरोजगार युवकांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढतच चालली आहे.बेरोजगार युवक शासकीय नोकरी आज मिळेल उद्या मिळेल,या आशेवर असतात.मात्र,आशेचे किरण उजळत नसल्याने चला आता व्यवसायाकडे वळले पाहिजे, अशी भूमिका घेत आहेत.त्यामुळे शासन स्तरावरून अनुदान स्वरूपात वा भांडवली स्वरूपात कर्ज काढून कुठला तरी व्यवसाय करावा यासाठी पुढाकार घेतात. अशातच बेरोजगार युवकाच्या कर्ज प्रकरणात दुसऱ्या व्यक्तीचे नाव समोर करून हिस्सा ठेवण्याचा प्रकार काल,सोमवारी १७ मार्चला गडचिरोली येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ कार्यालयात उघडकीस आला. आदिवासी समाजातील बेरोजगार युवकाला मालवाहू वाहन खरेदीसाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडून कर्ज हवे होते.हे कर्ज मंजूर करण्यासाठी शाखा व्यवस्थापकाच्या नावाने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारतांना गडचिरोली येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ कार्यालयातील कंत्राटी कार्यकारी लेखापाल रुपेश वसंत बारापात्रे याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले आहे.सदरची कारवाई चामोर्शी मार्गावरील महामंडळाच्या कार्यालयात करण्यात आली.तक्रारदार हे आदिवासी समाजातील बेरोजगार युवक आहेत. त्यांनी महामंडळाच्या ऑनलाइन पोर्टलवर मालवाहू वाहन खरेदी कर्ज मंजुरीकरिता अर्ज केला होता.या कर्ज मंजुरीसाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी करण्यात आली.त्यांनी याविरोधात लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाकडे तक्रार केली.पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता रुपेश बारापात्रे याने शाखा व्यवस्थापकाच्या(बँक मॅनेजर) नावे पंचसाक्षीदारासमक्ष ५० हजार रुपयांची लाच मागितली.त्यानुसार पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या पर्यवेक्षणात सापळा रचण्यात आला व ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रुपेश बारापात्रे याला रंगेहाथ पकडण्यात आले.
- Advertisement -