Friday, April 17, 2026
Homeचंद्रपूरबँकेची ऑनलाइन प्रणाली हॅक करून सायबर चोरट्यांनी ३ कोटी ७० लाख केले...

बँकेची ऑनलाइन प्रणाली हॅक करून सायबर चोरट्यांनी ३ कोटी ७० लाख केले लंपास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-सायबर चोरटे विविध युक्त्या वापरून ऑनलाईन फसवणूक करतांना तर दिसून येतच आहेत.अशातच चक्क बँकेचे सिस्टम हॅक करून बँकेतील रकमेवर डल्ला घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एनएएफटी व आरटीजीएस करण्याची ऑनलाइन प्रणाली हॅक करून सायबर चोरट्यांनी तब्बल ३ कोटी ७० लाख रुपये लंपास केल्याची घटना काल बुधवारी समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.बँक व्यवस्थापकांनी याबाबतची तक्रार रामनगर व सायबर पोलिस ठाण्यात केली आहे.जिल्ह्यात असा प्रकार पहिलाच असल्याचे बोलले जात आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विस्तार जिल्हाभरात झाला आहे.येथील खातेदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.ही बँक एका शासकीय बँकेशी लिंकअप आहे.त्याद्वारे ऑनलाइन व्यवहार केले जातात.या बँकेतून दररोज आरटीजीएस व एनएएफटी केली जाते.दरम्यान,७ फेब्रुवारी व १० फेब्रुवारीला अज्ञाताने आरटीजीएस व एनएएफटीची करण्याची ऑनलाइन प्रक्रियाच हॅक करून तेथून सर्व रक्कम दिल्ली व नोएडा येथील बँक खात्यावर वळती केली.ही बाब समोर येताच बँक व्यवस्थापनात खळबळ उडाली.दरम्यान,व्यवस्थापकांनी रामनगर पोलिस स्टेशन गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार दाखल होताच चंद्रपूर सायबर पोलिसांनी ३३ ट्रॉन्झेक्शन फ्रीझ करून ६० लाख ६४ हजार ५८२ रुपये परत जमा केले, तर ७१ लाख ३४ हजार ७३७ रुपये विविध बँक खात्याच्या अकाउंटला होल्ड झाले आहेत. सायबर पोलिसांच्या तत्काळ अॅक्शनने एक कोटी ३१ लाख ९९ हजार ३१९ रुपये वाचविण्यास यश आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोशल मीडियाच्या स्नॅपचॅटवर ओळख; बोलणे बंद करताच अश्लील फोटो व व्हिडीओ क्लिप केले व्हायरल.. – आरोपी तरुणास बेड्या..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २६ वर्षीय तरुणाची सोशल मीडियाच्या स्नॅपचॅटवर १९ वर्षीय तरुणीशी ओळख झाली.दोघांचेही स्नॅपचॅटवर चॅटिंग सुरू झाले. चॅटिंगदरम्यान तरुण हा आपल्या नातेसंबंधातीलच...

बापरे..! कासवांची तस्करी करणाऱ्यांकडून धक्कादायक बाबी उघड.. – अघोरी पूजेचे अत्यंत किळसवाणे व्हिडिओ आणि चॅटिंग..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द उपक्षेत्राच्या नियतक्षेत्र शिर्शी बिटातील चिचडोह बॅरेजवरून हरंबा गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर कासवाची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची...

विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा; प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्य,रोजगार व उद्योजकता,नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी...

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!