Friday, May 1, 2026
Homeमुंबईफुकटच्या योजनांमुळे सरकारची तिजोरी रक्तबंबाळ होऊ शकते -स्टेट बैंक ऑफ इंडियाचा अहवाल

फुकटच्या योजनांमुळे सरकारची तिजोरी रक्तबंबाळ होऊ शकते -स्टेट बैंक ऑफ इंडियाचा अहवाल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह किमान आठ राज्ये महिलांना थेट खात्यात पैसे जमा करण्याच्या योजनांमुळे आर्थिक अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या अहवालातच ही भीती व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांना दीड हजार रुपये देण्यात आले.विजयानंतर ही रक्कम २१०० रुपये केली जाणार आहे.त्यापूर्वी मध्य प्रदेशात हा प्रयोग यशस्वी झाला होता.आता दिल्लीसह इतर राज्येही त्याच मार्गावर चालली आहेत.
एसबीआयने याचा उल्लेख त्सुनामी असा केला आहे. फुकटच्या योजनांमुळे सरकारची तिजोरी रक्तबंबाळ होऊ शकते,अशा खरमरीत शब्दांत या धोक्याचे वर्णन केले आहे.या योजनांची ओळख पूर्णतः राजकीय असल्याचे मतही अहवालातून नोंदविले आहे.महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये राबवण्यात येत असलेल्या या योजनांचा खर्च आता १.५ लाख कोटींवर पोहोचला असून राज्यांच्या महसूल उत्पादनाच्या तुलनेत या खर्चाचे प्रमाण ३ ते ११ टक्क्यांमध्ये असे हा अहवाल सांगतो.करविरहित उत्पन्नाचे अधिक प्रमाण आणि कोणतेही कर्ज डोक्यावर नसलेल्या ओडिशासारख्या राज्यांमध्ये या महिला योजनांचा ताण झेलण्याची ताकद आहे.मात्र अन्य राज्यांसमोर या योजना आर्थिक संकट उभे करणार आहे.कर्नाटकात गृहलक्ष्मी योजनेत महिलांच्या खात्यात महिन्याला दोन हजार रुपये जमा करण्यात येत आहेत.या योजनेसाठी राज्याच्या महसूल उत्पन्नाचा ११ टक्के भाग म्हणजे २८ हजार ६०८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.पश्चिम बंगालमध्येही लक्ष्मी भंडार योजनेत आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांनी एकरकमी एक हजार रुपये दिले जात असून त्यासाठी १४ हजार ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.राज्याच्या महसूल उत्पन्नाच्या तुलनेत हे प्रमाण ६ टक्के आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!