- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित
सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला.नितीन जयपूरकर वय ४८ वर्षे,रा.फिस्के लेआऊट, धंतोली,काटोल,नागपूर असे मृताचे नाव असून ते एलआयसीच्या विकास अधिकारी पदावर कार्यरत होते.सदरची घटना १ सप्टेंबर रोजी सकाळी बारोकर गार्डन परिसरात घडली.विशेष म्हणजे,जयपूरकर यांना यापूर्वीही हृदयविकाराचा झटका आला होता.प्रकृती निरोगी राहण्यासाठी ते नियमित फिरायला जात असत. जयपूरकर सकाळी साडेपाचच्या सुमारास फिरण्यासाठी बाहेर पडले होते.सकाळी साडेसातच्या सुमारास ते गार्डनमध्ये कोसळल्याची माहिती रोशन सावरकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिली.कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले.मात्र,वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.याप्रकरणी पत्नी पल्लवी जयपूरकर यांच्या माहितीवरून काटोल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
- Advertisement -

