उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समीतीचे त्रिवार्शिक अधिवेशन सिंदूदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे १५ ते १६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान होणार असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील हजारो प्राथमिक शिक्षक समीतीचे सहकारी शिक्षक यात सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रतिनिधी योगेश ढोरे यांनी म्हटले आहे.
सदर अधिवेशनात शिक्षक विद्यार्थी यांच्या विविध प्रकारच्या समस्या व अडचणी यावर चर्चा होनार असल्याचेही त्यांनी सांगितले.अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री तथा शिक्षक मंत्री दिपक केसरकर उपस्थित राहणार आहेत.अधिवेशनाला जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समीतीचे राज्य प्रतिनिधी योगेश ढोरे यांनी केले आहे.