- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नक्षल विरोधी अभियानादरम्यान अचानक सुरू झालेल्या गोळीबारात चोख प्रत्युत्तर देत सुरक्षा दलांनी सहा नक्षलवाद्यांना यमसदनी धाडून घटनास्थळावरून इन्सास रायफल,स्टेनगन,३०३ रायफल,स्वयंचलित शस्त्रे,स्फोटके आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.सदरची चकमक ही छत्तीसगडच्या विजापूरच्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरातील घनघोर जंगलात घडली.काल मंगळवार सकाळपासूनच उद्यान परिसरात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये गोळीबार सुरू होता.चकमक संपताच
सायंकाळी शोध मोहिमेदरम्यान,सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह तसेच नक्षली सहित्ये आढळून आली.रात्रीपर्यंत नक्षलवाद्यांची ओळख पटवणे सुरू होते.काही नक्षलवाद्यांची ओळख पटली असून इतर नक्षलवाद्यांची ओळख आणि त्यांचा कोणकोणत्या घटनांमध्ये सक्रिय सहभाग होता,याची चौकशी सुरू असल्याचे विजापूरचे पोलिस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले.
- Advertisement -

