Thursday, May 28, 2026
Homeगडचिरोलीपोलीस-नक्षल चकमकीची दंडाधिकारीय चौकशी..

पोलीस-नक्षल चकमकीची दंडाधिकारीय चौकशी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली पोलीस उपविभागा अंतर्गत येणाऱ्या गट्टा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा-मोडस्के जंगल परिसरात बुधवार १७ सप्टेंबर २०२५ रोजी पोलीस आणि नक्षल चकमक उडाली होती. चकमकीत दोन महिला नक्षली ठार झाल्या होत्या.तसेच घटनास्थळावरून दोन मृतदेहांसह एक स्वयंचलित एके ४७ रायफल,एक अत्याधुनिक पिस्तुल,जिवंत दारुगोळा व अन्य साहित्य ताब्यात घेण्यात आले होते.एटापल्ली तालुक्याच्या मोडस्के जंगल परिसरात गट्टा दलमचे काही नक्षलवादी दबा धरुन बसल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस स्टेशन गट्टा जांबियाचे पोलीस पथक व केंद्रीय राखीव दलाचे १९१ बटालियनच्या ई कंपनीकडून जंगल परिसराला चारही बाजूंनी घेराबंदी घालण्यात आली होती.त्यानंतर अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयाचे अप्पर पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनीही पोलिसांच्या सी-६० दलाची पाच पथके रवाना केली होती.त्यानुसार,जंगल परिसरात शोधमोहीम सुरू असतांनाच नक्षलवाद्यांनी जवानांवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला.जवानांनी प्रत्युत्तर देत गोळीबार केला असता चकमक सुरू असतांनाच काही नक्षली जंगलाच्या दिशेने पळून गेले.चकमकीनंतर शोधमोहीम राबवली असता दोन महिला नक्षलिंचे मृतदेह तसेच नक्षलवादी साहित्य घटनास्थळावरून हस्तगत करण्यात आले होते.अश्यातच आता सदर घटनेतील मृत पावलेल्या व्यक्तींच्या कारणांचा शोध लावणे आवश्यक असल्याने प्रकरणात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता,२०२३ चे कलम १९६ अन्वये दंडाधिकारीय चौकशी करण्यात येणार आहे.त्यामुळे झालेल्या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छीणाऱ्या इसमांनी घटनेचे वर्णन,आपला या घटने विषयीचा अनुभव,घटनेनंतर किंवा आधी या घटनेशी संबंधीत काही घटना घडली असल्यास त्या विषयी माहिती,सरकारी किंवा अन्य यंत्रणेच्या प्रतिक्रिया किंवा सहभाग यांच्याविषयी आपले म्हणणे वा या घटनेशी संबंधीत इतर कोणतीही माहिती,आपले लेखी निवेदन शपथपत्रासह  उपविभागीय दंडाधिकारी एटापल्ली यांच्या न्यायालयात जाहीर सूचना प्रसिध्दी झाल्यापासून १५ दिवसाचे आत किंवा तत्पूर्वी कार्यालयीन वेळेत सादर करावीत,असे एटापल्लीचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!