Tuesday, June 16, 2026
Homeनागपूरपोलीस चौकशीत धक्कादायक माहिती पुढे.. १६ वर्षीय अल्पवयीन प्रियकराने १५ वर्षीय प्रेयसीला...

पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती पुढे.. १६ वर्षीय अल्पवयीन प्रियकराने १५ वर्षीय प्रेयसीला ठार करण्यासाठी चाकू बोलावला ऑनलाईन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूरच्या रामबाग परिसरात वास्तव्यास असणारा १६ वर्षीय अल्पवयीन प्रियकर व इयत्ता दहाव्या वर्गात शिक्षण घेणारी कौशल्यायन नगरातील एंजेल जॉन यांचे दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या प्रेमप्रकरणात मागील तीन महिन्यांपासून दुरावा निर्माण झाला.त्यामुळे एंजेलने त्याला भेटण्यास तसेच प्रेमसंबंध तोडण्याचा प्रयत्न केल्याने प्रियकराने खून केला.सदरची घटना ही अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बदामी कॉलनी परिसरात असलेल्या सेंट अँथोनी शाळेसमोर दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवार, २९ ऑगस्ट रोजी भर दुपारी घडली होती.एंजेल जॉन वय १५ वर्षे, रा.कौशल्यायन नगर,नागपूर असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती सेंट अँथोनी शाळेमध्ये इयत्ता दहाव्या वर्गात शिकत होती.तर अल्पवयीन आरोपी हा रामबाग परिसरात आई,भाऊ आणि बहिणीसह राहतो.आरोपी केअरटेकर म्हणून काम करतो.त्याचे वडीलही कुख्यात गुन्हेगार असून त्याच्या वडिलांवर चेन स्नॅचिंग,खून आणि हत्येचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल आहेत.शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास शाळा सुटली.त्यानंतर एंजेल तिच्या मैत्रिणींसोबत घरी जाण्यासाठी निघाली. शाळेतून बाहेर निघाल्यावर काही मीटर अंतरावरच दुचाकी घेऊन आलेला अल्पवयीन आरोपी तिची प्रतीक्षा करत होता.त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र,त्याला टाळून ती पुढे जाऊ लागली.आरोपीने तिला पकडले व खिशातून चाकू काढून तिच्या छातीवर वार केले.त्याने खोलवर घाव केल्याने मुलगी जोरजोराने ओरडत खाली पडली आणि क्षणात तिचा मृत्यू झाला. अल्पवयीन विद्यार्थिनीचा खून झाल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.खुनानंतर आरोपीने दुचाकी घटनास्थळावरच ठवेली व रक्ताने माखलेले कपडे आणि मोबाईल लपवून फरार झाला होता.पोलिस त्याचा कसून शोध घेत होते.दरम्यान,पोलिसांनी आरोपीच्या साथीदाराला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आरोपीला नागपूरच्या गंगाबाई घाट परिसरात सोडल्याची माहिती दिली होती.परंतु,पोलिसी खाक्या दाखविताच आरोपीच्या साथीदाराने त्याला कपिलनगरातील त्याच्या नातेवाइकाकडे सोडल्याची माहिती दिली.या माहितीवरून गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने कपिलनगर परिसरात शोधमोहीम राबवून आरोपीला त्याच दिवशीच्या मध्यरात्री ताब्यात घेतले व त्याची कसून चौकशी केली.चौकशीत आरोपीने खुनात वापरलेला चाकू ऑनलाईन मागविल्याची कबुली दिली.विशेष म्हणजे,आरोपीने खुनाचा कट आठ दिवसांपूर्वीच रचला होता.पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला बाल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची एक दिवसाची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज नागपुरात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन.. – सप्तखंजिरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज होणार सहभागी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नीटच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा,या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आज, मंगळवार १६ जून २०२६ रोजी...

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ होणार स्थापन.. – केंद्र चालक निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांना शासकीय सेवा स्थानिक पातळीवर सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहेत.यामध्ये ११५...

आता प्रथमच होणार जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला गती देण्यासाठी प्रथमच जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण राबविण्यात येत असून,गडचिरोली जिल्ह्यात...

उद्यापासून आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; अनेक कामे पडणार ठप्प..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात प्रशासन सकारात्मक भूमिका न घेता केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!