Sunday, July 12, 2026
Homeगडचिरोलीपोलिस-नक्षल चकमकी दरम्यान मृतदेह आढळलेल्या व्यक्तींची दंडाधिकारी चौकशी..

पोलिस-नक्षल चकमकी दरम्यान मृतदेह आढळलेल्या व्यक्तींची दंडाधिकारी चौकशी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- पोलिस स्टेशन,नारगुंडा अंतर्गत, कटरानगट्टा जंगल परिसरात दिनांक-१३ मे २०२४ रोजी झालेल्या पोलिस-नक्षल चकमकी दरम्यान एक पुरुष व दोन महिला मृतदेह सापडल्याने सदर मृत व्यक्तींच्या मृत्युच्या कारणांचा शोध लावण्यासाठी दंडाधिकारी चौकशी करण्यात येणार आहे.या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशी मध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभागीय दंडाधिकारी,एटापल्ली येथील यांच्या न्यायालयात १५ दिवसाचे आत सादर करावे; असे उपविभागीय दंडाधिकारी आदित्य जिवने यांनी कळविले आहे.

चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी स्वत: पाहिल्याप्रमाणे घटनेचे वर्णन,या घटनेविषयीचा अनुभव,घटनेनंतर किंवा आधी या घटनेशी संबंधीत काही घटना घडली असल्यास त्याविषयी माहिती, सरकारी किंवा अन्य यंत्रणेच्या प्रतिक्रिया किंवा सहभाग यांच्या विषयी आपले म्हणणे,या घटनेशी संबंधीत इतर कोणतीही माहिती या मुद्यांना अनुसरुन निवेदन द्यावे; असे कळविण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; वाघाची पाठीमागून झडप..

उद्रेक न्युज वृत्त  नागभीड(चंद्रपूर):-गावाजवळच्या परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने प्राणघातक हल्ला चढवून गुराख्यास गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना आज,रविवार १२ जुलै रोजी दुपारी...

आता कळलेय भावा? अवैध दारू बंद कां होत नाही तर.. – दारू पुरवठा करणाऱ्यांना मिळतोय ठेका; वाचा संपूर्ण करून कहाणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून दारू बंदीचा धिंडोरा पिटण्यात येत आहे.पण, खरोखरच दारू बंद झाली काय?आज कित्येक गावांमध्ये देशी,विदेशी, गावठी मोहफुलाची दारू व थंडगार...

प्रशासकांच्या आर्थिक अधिकारांवर मर्यादा; ग्रामीण अर्थचक्र मंदावले.. – ग्रामपंचायत निवडणुका पुढल्याच वर्षी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालवा,यासाठी सरकारने माजी सरपंच आणि सदस्य यांची प्रशासकीय समिती म्हणून नेमणूक केली आहे.त्यानुसार,माजी सरपंच...

३० वर्षीय तरुणाच्या कमरेत आढळली पिस्तूल; तर पॅन्टच्या खिशात आढळल्या पाच गोळ्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत एका ३० वर्षीय तरुणास अवैध शत्र बाळगल्या प्रकरणी अटक करून त्याच्याकडील पिस्तूल व पाच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!