Saturday, October 3, 2026
Homeनागपूरपोलिस उपनिरिक्षक असलेल्या वडीलासह आई व मुलावर गुन्हा दाखल…-शेअर ट्रेडिंगमध्ये दुप्पट नफ्याचे...

पोलिस उपनिरिक्षक असलेल्या वडीलासह आई व मुलावर गुन्हा दाखल…-शेअर ट्रेडिंगमध्ये दुप्पट नफ्याचे आमिष दाखवून अनेकांना लावला चुना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 नागपूर :-शेअर ट्रेडिंगमध्ये दुप्पट नफ्याचे आमिष दाखवून एका पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाने अनेकांना चुना लावला.मुलाच्या कामात पोलिस अधिकारी आणि त्याची पत्नीही मदत करीत होती. मोठी रक्कम गुंतवूनही ना लोकांना नफा मिळाला,ना मुळ रक्कम परत मिळाली.शेवटी पोलिसात तक्रार करण्यात आली.ही घटना मानकापूर पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली आहे.पोलिसांनी शुभम अनिल चौधरी वय २६ वर्षे रा.हार्दिक अपार्टमेंट, गोधनी रोडच्या तक्रारीवरून आरोपींवर गुन्हा नोंदविला आहे.सुधीर बघेल वय ५७ वर्षे,मीनाक्षी बघेल वय ५२ वर्षे आणि ओम बघेल वय २३ सर्व रा. हार्दिक अपार्टमेंट,नागपूर अशी आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,सुधीर हे कोराडी ठाण्यात पोलिस उपनिरिक्षक पदावर कार्यरत आहेत.त्यांचा मुलगा ओम हा रामदेव बाबा महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.तर मीनाक्षी ही गृहिणी आहे.फिर्यादी शुभम आणि आरोपी ओम एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात.जानेवारी २०२४ मध्ये ओमने शुभमला शेअर ट्रेडिंग करीत असल्याचे सांगितले.तसेच तो असे स्टॉक खरेदी करतो ज्यात काही दिवसांमध्येच रक्कम दुप्पट होत असल्याची माहिती दिली.त्याच्यावर विश्वास ठेवून शुभमने यूपीआयद्वारे त्याला ३ हजार रुपये दिले.चार दिवसातच ओमने नफा म्हणून त्याला २ हजार रुपये परत केले.शुभमने याबाबत त्याच्या मित्रांनाही सांगितले.त्याचे मित्र आशुतोष मिश्रा,योगेश वऱ्हाडे, शहादाब बंदुकी,प्रवीण बोंडे,अंकित चौधरी आणि शुभमचे मामा धर्मेंद्र देशमुख हे सुद्धा ओमकडे पैसे गुंतवायला लागले.

बरेच दिवस होऊनही गुंतवलेल्या रकमेवर नफा न मिळाल्याने पीडितांनी ओमच्या घरी जाऊन दबाव टाकला.आरोपींनी धमकावून पीडितांना पळवून लावले.खोट्या प्रकरणात अडकवून जीवन उद्धवस्त करण्याची धमकी दिली जात होती.शेवटी त्रस्त होऊन सर्वांनी प्रकरणाची तक्रार डीसीपी राहुल मदने यांच्याकडे केली.त्यानंतर सुधीर यांनी पैसे परत करण्याचे लिखित आश्वासन दिले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!