Saturday, June 13, 2026
Homeगोंदियापोलिसांना चकमा देऊन पळून जाणाऱ्या आरोपीचे पोलिसांनी आवळल्या मुसक्या….

पोलिसांना चकमा देऊन पळून जाणाऱ्या आरोपीचे पोलिसांनी आवळल्या मुसक्या….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 अर्जुनी मोरगाव(गोंदिया) :-आरोपीला उपचाराकरिता रुग्णालयात नेले असता त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. पोलिसांच्या दृष्टीस येऊ नये म्हणून त्याने अंगावरील कपडे काढून चिखल माखला व जंगलातील गर्द दाट झुडपात दडून बसला.अखेर सहा तासांत सी ६० जवानांनी स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने आरोपीला बुधवारी (दि.२४) दुपारी ४:३० च्या सुमारास बोदरा जंगल परिसरात पकडण्यात यश आले.

आईच्या प्रियकराला ठार केल्याप्रकरणी बोंडगावदेवी येथील भीमसेन माणिक रामटेके वय १९ वर्षे याला पोलिसांनी ताब्यात घेतले.तो पोलिस कोठडीत असताना बुधवारी सकाळी त्याने छातीत दुखत असल्याची पोलिसांकडे तक्रार केली.पोलिसांनी सकाळी ८:४५ वाजताच्या सुमारास त्याला अर्जुनी मोरगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेले.डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला भरती करण्यात आले. त्याला सलाइन लावली.१०:३० वाजता त्याने उलटी येत असल्याचा बहाणा केला.पोलिसांनी त्याला सलाइनसह रुग्णालयाबाहेर नेले.त्याचवेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो सलाइनसह पळाला.पळताना त्याने सलाइन ओढून फेकून दिली. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला.एका ठिकाणी शेवाळ असल्याने पाय घसरून पोलिस पडला.त्याच्या डोक्याला दुखापत झाली. दुसऱ्या पोलिसानेसुद्धा पाठलाग केला.पण आरोपी हाती लागला नाही.पाठीमागील आवार भिंतीवरून उडी घेत तो जंगलाच्या दिशेने पळून गेला.पोलिसांनी आजूबाजूच्या सर्व पोलिस ठाण्यांना सूचना केली सी ६० जवानांच्या पथकाला पाचारण केले.जंगल परिसरात पोलिसांनी शोध मोहीम राबवली.पोलिसांच्या दृष्टीस येऊ नये म्हणून आरोपीने अंगावरील कपडे काढले व अंगाला चिखल लावून घेतला.तो दाट गर्द झुडपात दडून बसला.परंतु पोलिसांच्या नजरेतून तो सुटू शकला नाही.पोलिसांनी अखेर त्याला पकडले.

बुधवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरूच होती.या पावसामुळे पोलिसांच्या शोधकार्यात बाधा उत्पन्न होत होती.आरोपी सुद्धा जास्त लांब जाऊ शकला नाही.आरोपीला नशापाणी करण्याची सवय असल्याचे समजते.यापूर्वी सुद्धा त्याला एका गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.पोलिसांच्या तावडीतून आरोपी पळून गेल्यामुळे अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्यात २६२ भारतीय न्याय संहिता (बीएनएस)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अर्जुनी मोरगावच्या ग्रामीण रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे असूनही ते बंद अवस्थेत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

​देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात परिचारिकेच्या प्रसंगावधनाने वाचले प्रसूतीपश्चात मातेचे प्राण..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात एका प्रसूतीपश्चात मातेला हृदयविकाराचा झटका(Cardiac Arrest)आला असता कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत आणि तत्परतेने सीपीआर(CPR)देऊन मातेचे...

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!