- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :-सर्दी, ताप,ॲलर्जी,अंगदुखी आदी आजारांवर सर्रास वापरण्यात येणारी प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स),जीवनसत्त्वे,वे दनाशामक अशा १५६ औषधांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.ही औषधी खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात; असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.कॉस्मेटिक्स ॲक्ट कायद्या १९४० च्या कलम ‘२६ अ’ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.बंदी घातलेल्या औषधांची निर्मिती, विक्री,वितरणावर बंदी घालण्यात आली आहे.तात्काळ प्रभावाने हा निर्णय लागू झालेला आहे.औषधांत ‘एसिक्लोफेनाक-५०,’ ‘पॅरासिटामोल-१२५ मिलिग्रॅम,पॅरासिटामोल ३०० मिलिग्रॅम,मेफेनैमिक ॲसिड पॅरासिटामोल इंजेक्शन,सेटीरिजीन एचसीएल पॅरासिटामोल फेनिलफ्राइन एचसीएल,लेवोसेटिरिजीन फिनाइलफ्राइन एचसीएल पॅरासिटामोल,पॅरासिटामोल क्लोरफेनिरामाइन मैलेट,फिनाइल प्रोपेनोलामाइन आणि कैमिलोफिन डाइहाइड्रोक्लोराइड-२५ मिलिग्रॅम आदींवरही बंदी आली आहे.या औषधांचा वापर केसगळती,त्वचेची निगा,ताप,अंगदुखी आदीसांठी केला जात होता.
- Advertisement -