Sunday, August 2, 2026
Homeगडचिरोलीपूर ओसरला; प्रशासनाकडून घराघरांत जाऊन पाहणी..

पूर ओसरला; प्रशासनाकडून घराघरांत जाऊन पाहणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन दिवसांत  झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड तालुक्यातील पर्लकोटा आणि पामुलागौतम नदीला मोठा पूर आला होता.परिस्थिती आता सामान्य असून पूर ओसरल्यानंतर प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अमर राऊत आणि तहसीलदार किशोर बागडे यांनी पूरग्रस्त वस्त्यांमध्ये घराघरांत जाऊन नागरिकांची भेट घेतली.यावेळी त्यांनी पूरामुळे झालेल्या घरगुती व इतर साहित्याच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली तसेच नागरिकांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी पूरामुळे बाधित झालेल्या पायाभूत सुविधांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,महावितरण तसेच दूरसंचार विभागाचा अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्थळांना भेट देऊन नुकसानाचा आढावा घेण्याचे आणि रस्ते,वीजपुरवठा तसेच दूरसंचार सेवा पूर्ववत करण्यासाठी तात्काळ दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रशासनामार्फत पूरग्रस्त भागातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून,नुकसानीचे पंचनामे,मदत वितरण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे. नागरिकांनी प्रशासनाशी समन्वय ठेवून आवश्यक माहिती द्यावी तसेच अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ आत्महत्येचे कारण आले समोर.. – दोन सख्ख्या भावांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेतल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील माळेगाव  टाऊन परिसरात गुरुवार ३० जुलै २०२६ रोजी दोन सख्ख्या भावांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सकाळच्या सुमारास...

चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात चीमुकल्यांवर अत्याचार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी)च्या अहवालानुसार,महाराष्ट्र राज्यात बालकांवरील अत्याचारांचे प्रमाण...

तीन चिमुकल्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू; आज दुपारच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील मौजा-खेडेगाव येथे आज,शनिवार १ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी...

अखेर पुरात वाहून गेलेल्या ‘त्या’ इसमाचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथे अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यात पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असतांनाच अखेर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!