Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीपुलावरून चालत जात असतांना तोल गेला अन् गळफास लागून जीव गेला..!

पुलावरून चालत जात असतांना तोल गेला अन् गळफास लागून जीव गेला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शेताकडे निघालेल्या एका अविवाहित तरुणाचा नदी पुलाच्या काठावरून पायी चालत जात असतांना अचानकपणे तोल जाऊन त्याची टी-शर्ट पुलाच्या मोडकळीस आलेल्या लोखंडी अँगलमध्ये अडकली.यात टी शर्ट फाटली आणि गळ्याभोवती फास लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना धानोरा तालुक्याच्या सोडे गाव परिसरात घडली.सुखदेव जणू हलामी वय ३२ वर्षे,रा.सोडे,ता.धानोरा,जि.गडचिरोली
असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.सदरची घटना ही काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली असून आज,शनिवार ३१ जानेवारी रोजी सुखदेव याचे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडला.
सुखदेव हलामी हा शुक्रवारी सकाळच्या सुमारास शेताकडे जाण्यासाठी निघाला होता.शेत गावापासून हाकेच्या अंतरावर नदी पलीकडे असल्याने धानोरा मार्गावरील कठाणी नदी पुलाच्या काठावरून पायी चालत जात असतांना अचानक त्याचा तोल गेला. पुलाला कठडे नसल्याने तोल जाताच त्याचे टी-शर्ट पुलाच्या मोडकळीस आलेल्या लोखंडी अँगलला अडकले.यात टी शर्ट फाटून त्याच्या गळ्याभोवती फास लागला.यातच त्याचा मृत्यू झाला.नंतर काही वेळाने मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना तो पुलाच्या कठड्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.लागलीच घटनेची माहिती तात्काळ गावातील पोलीस पाटील संदीप परसा यांना देण्यात आल्याने त्यांनी धानोरा पोलिसांना पाचारण केले.पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.घटनेने मृतक सुखदेवची आई व भावास मोठा धक्का बसला आहे.प्रकरणाचा पुढील तपास धानोरा पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!