उद्रेक न्युज वृत्त :- पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. इ-केवायसी प्रक्रीया पूर्ण न केलेल्या राज्यातील सुमारे २० लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे.मात्र,कोणत्याही परिस्थितीत १४ व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि बँक खाते आधारशी लिंक करून घेणे गरजेचे आहे.ही सूट फक्त १३ व्या हप्त्यासाठीच देण्यात आलेली आहे.हे लक्षात घ्यावे; असे आवाहन राज्याच्या कृषीविभागाचे उपायुक्त गणेश घोरपडे यांनी केले आहे.
इकेवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे.१३ व्या हप्त्यापुरती ही अट शिथिल करण्यात आली असून येत्या सोमवार २७ फेब्रुवारी रोजी २० लाखांसह राज्यातील ८१ लाख २९ हजार ५६३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १३ हा हप्ता जमा होणार असल्याची माहिती घोरपडे यांनी दिली व पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी आणि बँक खात्याचे आधार लिंक झाल्याची खात्री करावी; असे आवाहनही केले आहे.