Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजपीएमश्री छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद शाळेत 'आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन' उत्साहात साजरा..

पीएमश्री छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद शाळेत ‘आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन’ उत्साहात साजरा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा येथे २८ सप्टेंबर २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिनानिमित्त शाळेत विविध शैक्षणिक आणि सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये निबंध स्पर्धा,पोस्टर स्पर्धा,प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच इतर स्पर्धांचा समावेश होता.या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक  किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना माहिती अधिकार कायद्याचे सामाजिक महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमादरम्यान शिक्षक शिवराम हाके आणि कुमारी अपेक्षा देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना माहिती अधिकार कायदा,त्याचा उपयोग आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्व याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून माहिती अधिकार विषयाची सखोल चर्चा घडवून आणली.या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता निबंध लेखनातून त्यांनी माहिती अधिकाराबद्दलचे विचार मांडले,तर पोस्टर स्पर्धेतून सर्जनशील कलाकृतीद्वारे संदेश दिला.तर प्रश्नमंजुषा स्पर्धेतून त्यांनी ज्ञानाची उजळणी केली.या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये माहितीच्या अधिकाराबाबत जागरूकता,संवेदनशीलता आणि माहिती मिळविण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक किशोर चव्हाण यांनी शाळेचे सहाय्यक शिक्षक शिवराम हाके, शिक्षिकाकु.अपेक्षा देशपांडे, मार्गदर्शक तथा सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानत कौतुक केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!