Thursday, September 3, 2026
Homeनागपूरपाय घसरला अन् आईसह चिमुकला पडला कालव्यात.. - दोघेही वाहून गेले; शोधकार्य...

पाय घसरला अन् आईसह चिमुकला पडला कालव्यात.. – दोघेही वाहून गेले; शोधकार्य सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-कालव्याच्या पुलावरून पायी जात असतांनाच अचानक पाय घसरला आणि आईने हात पकडुन ठेवलेला पाच वर्षीय चीमुकलाही पेंच जलाशयाच्या डाव्या कालव्यात पडल्याची घटना पारशिवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पटगोवारी शिवारात काल मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली असून सायंकाळपर्यंत त्या दोघांचा कुठेही थांगपत्ता लागला नव्हता.पारशिवनी तालुक्यातील पेंच जलाशयाचा डावा कालवा माहुली,पटगोवारी मार्गे रामटेक तालुक्यातून भंडारा जिल्ह्यात जातो.त्यात पाणी सोडण्यात आल्याने तसेच पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने दोघेही वाहून आई सह मुलगाही वाहून गेला.अल्का शेखर बिहुने वय २८ वर्षे व अरमान शेखर बिहुने वय ५ वर्षे दोघेही रा.पटगोवारी,ता.रामटेक,जि.नागपूर अशी वाहून गेलेल्या आई व मुलाचे नाव आहे.
अल्का तिच्या मुलाला घेऊन काल मंगळवारी दुपारी पटगोवारी चिचभुवन पारशिवनी मार्गावरील पुलावर गेली होती.या परिसरात काही मजूर काम करीत होते.त्यानंतर ती मुलाला घेऊन पुलाच्या उजव्या बाजूला असलेल्या कालव्याच्या रस्त्याने पायी जायला निघाली,असे प्रत्यक्ष दर्शिंनी बघितले.या पुलापासून किमान पाचशे मीटर अंतरावर तिचा पाय घसरला आणि दोघेही कालव्यात पडले.कालव्यातील पाण्याचा प्रवाह गतिमान असल्याने दोघेही रामटेक तालुक्याच्या दिशेने वाहत गेले.माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते,ठाणेदार राजेशकुमार थोरात,हवालदार पृथ्वीराज चव्हाण,मुद्दसर जमाल, देवा उकेबोंद्रे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून दोघांचाही शोध सुरू केला.सायंकाळपर्यंत ते कुठेही आढळून आले नाहीत. अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले असून आज,बुधवार १३ ऑगस्ट रोजी पुन्हा शोधकार्य राबविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!