Sunday, September 6, 2026
Homeगोंदियापाच वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने नेले उचलून; चिमुकल्याचा मृत्यू.. - आज पहाटेची घटना..

पाच वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने नेले उचलून; चिमुकल्याचा मृत्यू.. – आज पहाटेची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालय गोठणगाव नजीकच्या संजयनगर (बंगाली कॅम्प)येथील पाच वर्षीय चिमुकला अंगणात लघुशंकेला उठलेला असतांना दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवून उचलून नेल्याची घटना आज,गुरुवार २५ सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली.बिबट्याने चिमुकल्याच्या मानेला धरून उचलून नेत जंगलाच्या दिशेने जात असतांनाच नागरिकांनी आरडाओरड केली.त्यामुळे बिबट्याने मुलाला सोडून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.यात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला.वंश प्रकाश मंडल वय ५ वर्षे असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
आज पहाटेच्या सुमारास वंश झोपेतून उठून घरा समोरील अंगणात लघुशंकेला गेला असता दबा
धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. जवळच असलेल्या त्याच्या आजीने आरडारोड केल्याने परिसरातील नागरिकांनी धावपळ सुरू केली. चिमुकल्याला बिबट्या जंगल परिसरात नेणार तोच नागरिकांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने वंशला खाली ठेवत जंगलाच्या दिशेने पसार झाला.ग्रामस्थांनी क्षणाचाही विलंब न लावता वंशला तात्काळ केशोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले.तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गावकऱ्यांनी वन विभागाप्रती रोष व्यक्त केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!