Tuesday, September 1, 2026
Homeनागपूरपहिल्या सत्रात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने चादरीच्या साहाय्याने घेतला गळफास..

पहिल्या सत्रात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने चादरीच्या साहाय्याने घेतला गळफास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-विद्यार्थी,विवाहित पुरुष-महिला,प्रियकर-प्रेयसी व अनेकजण स्वतःला गळफास लावून भगवंताने दिलेले अमूल्य जीवन क्षुल्लकशा कारणासाठी संपवत असल्याच्या घटना विविध ठिकाणी उघडकीस येऊ लागल्या आहेत.कुणी नैराश्यात,तर कुणी संतापाच्या भरात,तर कुणी रोजच्या किटकिटी पायी टोकाचे पाऊल उचलतांना दिसून येतात.अश्याच प्रकारे आज,रविवार १२ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास नागपूरच्या लाडीकर ले-आऊट परिसरात एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने नैराश्यात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.अर्श नरेश बांते वय १८ वर्षे,रा.मंगलधाम सोसायटी,लाडीकर ले-आऊट,नागपूर असे विद्यार्थ्याचे नाव असून तो बीसीएच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता.विशेष म्हणजे,अर्शने चालू शैक्षणिक वर्षात बीसीए अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता.पहिल्या सेमिस्टरला(पहिले सत्र)तो अनुत्तीर्ण झाला.त्यामुळे तो तणावात होता.काल शनिवारच्या रात्री जेवण केल्यावर तो आपल्या खोलीत झोपायला गेला. त्यानंतर आज सकाळी उशीर झाल्यावरही अर्श खोलीच्या बाहेर न आल्याने त्याच्या आईने दार ठोठावून त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र,प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी त्याच्या वडिलांना माहिती दिली. त्यानंतर,दार तोडून आत गेले असता,अर्शने पंख्याला चादरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.त्याला खाली उतरवून उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणी अंती मृत घोषित केले. याबाबत हुडकेश्वर पोलिसांना सूचना मिळताच,त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!