- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-प्रेमाची सीमाच नाही,”प्रेमात आणि युद्धात सर्वकाही” अशी म्हण आहे.पण,सदरची म्हण सर्वच ठिकाणी लागू होणार,असे मुळीच नाही.अश्याच प्रकारे पहिली पत्नी नावडती झाल्याने दुसरीचा मोह करणाऱ्या पतीला नातेवाईकांनी समजुतीसाठी बोलावले अन् जो धो-धो धुतला की,यात पती आणि प्रेमिकाचा हात फॅक्चर होई पर्यंत सोडलेच नाही. सदरची घटना ही नागपूरच्या बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घोगली चौकात घडली.५५ वर्षीय राजेंद्र असे पतीचे नाव आहे,तर अपर्णा असे प्रेमिकेचे नाव आहे.राजेंद्रची वडिलोपार्जित जमीन आहे.पहिली पत्नी असतांना त्याचे अर्पणा नावाच्या महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत.तो बहुतांश वेळ अर्पणासोबत घालवितो.त्यामुळे त्याची पहिली पत्नी आणि तिचे नातेवाईक संतप्त झाले होते.११ ऑगस्टला पहिल्या पत्नीच्या नातेवाइकांनी राजेंद्रला चर्चा करण्यासाठी बेलतरोडीच्या घोगली चौकात बोलविले.राजेंद्र अर्पणासोबत तेथे पोहोचला.तेथे पहिल्या पत्नीचे नातेवाईक असलेले दोन पुरुष व दोन महिला उपस्थित होत्या.त्यांनी अर्पणा सोबत का राहतो,अशी विचारणा करून राजेंद्र आणि अर्पणा यांना लाकडी दांड्याने चांगलेच धुतले.यात अर्पणाचा हात फॅक्चर झाला.दोघांनाही उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले.राजेंद्रने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पहिली पत्नी आणि तिच्या नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- Advertisement -

