Thursday, September 10, 2026
Homeनागपूरपत्नी कमावती आहे म्हणून तिला पोटगी नाकारली जाऊ शकत नाही- उच्च न्यायालय

पत्नी कमावती आहे म्हणून तिला पोटगी नाकारली जाऊ शकत नाही- उच्च न्यायालय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-पत्नी सुशिक्षित आहे.ती अभियांत्रिकी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून सेवा देत आहे.तिला ५४ हजार रुपये मासिक वेतन मिळते.ती स्वतः सह मुलाचा सांभाळ करण्याकरिता सक्षम असल्यामुळे तिला पोटगी देण्याची गरज नाही,असा मुद्दा पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मांडताच न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी सदरचा मुद्दा गुणवत्ताहीन ठरवला आणि पत्नी कमावती आहे म्हणून तिला पोटगी नाकारली जाऊ शकत नाही.सासरी शारीरिक-मानसिक छळ होत असेल,चांगली वागणूक मिळत नसेल आणि सन्मानाने जगण्याची आशा संपली असेल तर,पत्नी ही पतीसोबत राहण्यास नकार देऊ शकते.अशावेळी ती स्वतःहून वेगळी राहते,या कारणावरून तिला पोटगी नाकारली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करून पत्नी व अल्पवयीन मुलाची पोटगी कायम ठेवली.
प्रकरणातील पती नागपुरातील रहिवासी आहे,तर पत्नी यवतमाळ येथील रहिवासी आहे.या दाम्पत्याचे १९ नोव्हेंबर २०१९ रोजी विवाह झाला.त्यानंतर,कौटुंबिक वादामुळे पत्नीला माहेरी जावे लागले.त्यांना सहा वर्षांचा मुलगा आहे.कुटुंब न्यायालयाने पत्नी व मुलाला प्रत्येकी दोन हजार रुपये मासिक पोटगी मंजूर केल्यामुळे त्याविरोधात पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.विशेष बाब म्हणजे,पतीने पोटगीची जबाबदारी टाळण्यासाठी न्यायालयाला स्वतःच्या उत्पन्नाची माहिती दिली नाही. त्याने न्यायालयाला सांगितले की,त्याच्याकडे उत्पन्नाचे काहीच साधन नाही.तो आईवर अवलंबून आहे आणि आई त्याला खर्च भागविण्यासाठी महिन्याला दहा हजार रुपये देते.परंतु,न्यायालयाने पतीचा हा दावा फेटाळून लावला आणि कुटुंब न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवत पोटगी देण्याचे आदेश दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!