- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-चारित्र्या च्या संशयावरुन पती-पत्नीमधील भांडण विकोपाला गेल्याने पतीने पत्नीच्या डोक्यावर खलबत्त्याने वार करुन खून केला व नंतर शेजारील विहिरीत टाकले असल्याची घटना काल, बुधवारी १६ ऑक्टोंबरच्या सकाळी ११ वाजताच्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथे उघडकीस आली होती.स्नेहा लोकेश बाळबुद्धे वय ३२ वर्षे असे मृत महिलेचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा पती लोकेश गुणाजी बाळबुद्धे वय ३५ वर्षे याच्याविरुद्ध देसाईगंज पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आज,गुरुवारी १७ ऑक्टोंबरला आरोपी लोकेश बाळबुद्धे यांस न्यायालयात हजर केले असता,त्याला न्यायलयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दोघा पती-पत्नीचे भांडण विकोपाला गेल्याने लोकेशने घरातील खलबत्ता उचलून स्नेहाच्या डोक्यावर मारला होता.डोक्यावर वार केल्याने स्नेहा गंभीर जखमी होऊन खाली कोसळली आणि डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला.त्यामुळे पत्नी मरण पावली असे आरोपीच्या लक्षात येताच तिला उचलून घराबाहेरील चौकातील विहिरीत नेऊन टाकले व स्वतःच ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले होते.त्यानुसार आज न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
- Advertisement -

