Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीन्यायालयीन प्रकरणे आपसी सामंजस्याने मिटवायचीय; तर घ्या लोकअदालतीचा लाभ..

न्यायालयीन प्रकरणे आपसी सामंजस्याने मिटवायचीय; तर घ्या लोकअदालतीचा लाभ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक रा.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली येथे येत्या १३ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.या लोकअदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीने केले आहे.सदरची लोकअदालत जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोली आणि अहेरी तसेच अहेरी,आरमोरी,चामोर्शी,देसाईगंज,धानोरा,कुरखेडा आणि सिरोंचा येथील तालुका न्यायालयांमध्ये आयोजित केली जाईल.लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेल्या तडजोडीस पात्र दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे,चेक बाऊन्सची प्रकरणे (कलम १३८ एन.आय.ॲक्ट),भूसंपादन, कौटुंबिक वाद,मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई दावे,बँकेशी संबंधित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन,मोबाईल कंपनी,वीज वितरण कंपनी,पतसंस्था आणि नगर परिषद व ग्रामपंचायतीच्या कर आकारणीशी संबंधित प्रकरणे आपसी सामंजस्याने निकाली काढली जातील.
  • लोकअदालतीचे फायदे👇
  • प्रकरणे तडजोडीसाठी ठेवतांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
  • लोकअदालतीच्या निकालांविरोधात अपील करता येत नाही,त्यामुळे वादांचा त्वरित निपटारा होतो.
  • न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे लोकअदालतीतील निकालाची अंमलबजावणी करता येते.
  • साक्षी-पुरावे,उलटतपासणी आणि दीर्घ युक्तिवादासारख्या वेळखाऊ प्रक्रियांना टाळता येते.
  • निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कोर्ट फीची रक्कम नियमानुसार परत मिळते.
सर्व पक्षकार,वकील आणि नागरिकांनी येत्या १३ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या या राष्ट्रीय लोकअदालतीत सहभागी होऊन आपापली प्रकरणे निकाली काढण्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीचे सचिव ए.पी. खानोरकर यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!