- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-थोर समाजसुधारक तथा स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंती दिनाचे औचित्य साधून आज,सोमवार २३ फेब्रुवारी रोजी देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर येथे प्रेरणादायी व शिस्तबद्ध कार्यक्रमाचे आयोजन करून संत गाडगेबाबा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे संचालन शिक्षक मंगेश तुपट यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक ईश्वर गहाणे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका प्रियंका तलमले व प्राची खरकटे यांनी अतिशय सुयोग्य व नियोजनबद्ध पद्धतीने केले.
कार्यक्रमासाठी शिक्षिका अपर्णा जडे व वृषाली सुखदेव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना संत गाडगेबाबा महाराजांच्या स्वच्छता,शिक्षण,सेवाभाव व व्यसनमुक्ती या विचारांची सखोल ओळख झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक खेमराज नारायण तिघरे उपस्थित होते.मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, “स्वच्छता ही सवय नसून संस्कार आहे. शिक्षणासोबतच चांगले विचार व सामाजिक जबाबदारी अंगीकारली तरच खरे नागरिक घडतात.” त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त,सेवाभाव आणि समाजप्रती कर्तव्याची जाणीव अधिक दृढ झाली.प्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा,विचारमंचन व संकल्प वाचनाद्वारे सक्रिय सहभाग नोंदवला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.संत गाडगेबाबा महाराजांच्या विचारांना कृतीची जोड देत हा जयंती कार्यक्रम अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
- Advertisement -

