Thursday, September 3, 2026
Homeचंद्रपूरनिवडणूक विषय अत्यंत महत्वाचा असून कोणतीही चूक किंवा हलगर्जीपणा होणार नाही,याची दक्षता...

निवडणूक विषय अत्यंत महत्वाचा असून कोणतीही चूक किंवा हलगर्जीपणा होणार नाही,याची दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत यंत्रणेचा आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले की,निवडणूक प्रक्रिया निर्भय,मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही आपली जबाबदारी व कर्तव्य आहे.स्थानिक स्तरावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही,याची दक्षता घेण्यासाठी पोलिस विभाग तसेच इतर यंत्रणांशी योग्य समन्वय ठेवावा.आतापासूनच स्थायी निगराणी पथक व फिरते निगराणी पथकाचे नियोजन करावे. आपापल्या हद्दीतील चेक पोस्टवर तपासणी नियमितपणे सुरू ठेवावी.निवडणूक विषय अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे कायदे व नियमांचे अधिकाऱ्याऱ्यांनी वाचन करावे.यात कोणतीही चूक किंवा हलगर्जीपणा होणार नाही,याची दक्षता घ्यावी, अन्यथा संबंधितांवर जबाबदारी निश्चित केली जाईल.उपविभागीय अधिकाऱ्यांनी तडीपारीच्या प्रकरणांचा त्वरित आढावा घ्यावा, तडीपारीची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावी,तालुकास्तरावरील दक्षता समितीच्या बैठका नियमितपणे घेऊन उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना बैठकीत आमंत्रित करावे,अशाही सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार,महानगर पालिकेच्या प्रभारी आयुक्त डॉ.विद्या गायकवाड,उपविभागीय अधिकारी अजय चरडे,उपजिल्हाधिकारी(निवडणूक) शुभम दांडेकर,तहसीलदार विजय पवार,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!