Thursday, August 27, 2026
Homeगोंदियानिवडणूक कर्तव्यात कसूर प्रकरणी दोन कर्मचारी निलंबित...

निवडणूक कर्तव्यात कसूर प्रकरणी दोन कर्मचारी निलंबित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने गोंदिया विधानसभा मतदारसंघ अंतर्गत लघू पाटबंधारे विभागाचे अभियंता अजय रहांगडाले, ग्रामपंचायत अधिकारी हेमंत वसंत लेंढे यांची स्थिर सर्वेक्षण पथक मैदान,आमगाव रोड,गोंदिया या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती.त्यांनी गैरहजर राहून त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्यावर काल,सोमवारी ११ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाची कारवाई केली.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोंदिया यांनी रविवारी १० नोव्हेंबरच्या रात्री ९:४५ च्या सुमारास स्थिर सर्वेक्षण पथक,पतंगा मैदान आमगाव रोड गोंदिया येथे भेट दिली असता अजय रहांगडाले, उपविभाग गोंदिया पथक क्र.२ (नियुक्तीच्या वेळी दुपारी २ ते रात्री १० पर्यंत) आणि हेमंत वसंत लेंढे, पथक क्र.३ (नियुक्तीच्या वेळी १० ते सकाळी ६ पर्यंत) हे रात्री ११ वाजेपर्यंत आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी अनधिकृत गैरहजर आढळले.संबंधितांनी आपल्या कर्तव्यात निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा दाखवून आपल्या कर्तव्यात गंभीर स्वरुपाचे कसूर केल्याने संबंधिताविरुद्ध तात्काळ प्रभावाने निलंबनाची कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले.
निवडणूक कामकाज कर्तव्याच्या ठिकाणी अनधिकृत गैरहजर आढळून आल्याने आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषदा,जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग केल्याने कार्यवाहीस पात्र ठरत असल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषदा,जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ चे नियम ३ मधील तरतुदीनुसार जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम.यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी अजय रहांगडाले व हेमंत लेंढे यांना निलंबित केले आहे.त्यामुळे निवडणूक कामकाज कर्तव्यावर असलेल्या कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी अनधिकृत गैरहजर राहू नये; अशी सूचना केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!