Tuesday, July 14, 2026
Homeगडचिरोलीनागपूर येथे 'पाऊसधारा' कवी संमेलन २०२४ संपन्न..-मुलचेरा तालुक्याच्या अडपल्ली चक येथील युवा...

नागपूर येथे ‘पाऊसधारा’ कवी संमेलन २०२४ संपन्न..-मुलचेरा तालुक्याच्या अडपल्ली चक येथील युवा कवी तथा लेखक प्रभाकर दुर्गे यांचा सत्कार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर अंतर्गत मराठीचे शिलेदार,बिनधास्त न्युज, साप्ताहिक साहित्य गंध,बि.एस.फोर.न्युज यांच्या वतीने काल,रविवार दिनांक- २३ जून २०२४ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन ऊरवेला सोसायटी वर्धा रोड नागपूर येथे ज्येष्ठ कवयित्री कुसुमलता वाकडे लिखित ‘पंख पैजण’ या कथासंग्रहाचे प्रकाशन तसेच पाऊसधारा कवीसंमेलन २०२४ आयोजित करण्यात आले होते.या कवी संमेलनात राज्यभरातून विविध ठिकाणाहून कवी,कवयित्री यांनी सहभाग नोंदवला होता.त्यात गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुका अंतर्गत येणाऱ्या अडपल्ली चक या गावचे युवा कवी तथा लेखक प्रभाकर देविदास दुर्गे यांचा देखील सहभाग होता.त्यांनी आपली स्वरचित कविता “प्रतिक्षेच्या वाटेवरून” सादर करून उपस्थित जेष्ठ व श्रेष्ठ मान्यवर,सर्व उपस्थित कवी,कवयित्री व गोळा झालेल्या सर्व रसिक वर्गांची टाळ्यांची दाद मिळवत सर्वांची मने मोहून घेतली.त्यांचा साहित्य क्षेत्रातील प्रवास पाहून उपस्थित मान्यवर संमेलनाध्यक्षा सविता धमगाये (ज्येष्ठ कवयित्री,लेखिका नागपुर), प्रमुख अतिथी डॉ.अनिल पावशेकर (नागपूर स्तंभ लेखक), प्रमुख मार्गदर्शक रत्नाकर तिडके (ज्येष्ठ साहित्यिक भंडारा),प्रमुख मार्गदर्शक अरविंद उरकुडे (विश्वस्त प्रमुख),प्रमुख पाहुणे नितेश क्षिरसागर (गोंदिया), आदिती सिरसीकर (नागपुर),सुरज भिलकर (नागपूर) व या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक,मराठीचे शिलेदार चे सर्वेसर्वा राहुल पाटील या सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,पुष्पगुच्छ,जागर मराठीचा साहित्यिक अंक देऊन युवा कवी प्रभाकर देविदास दुर्गे यांचा सत्कार करण्यात आला.सत्काराबद्दल साहित्यिक सहकारी,मित्रपरिवार,ग्राम वासिय जनता तसेच नातेवाईकांकडून दुर्गे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!